आयजीएमच्या इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:44 PM2018-07-15T23:44:51+5:302018-07-15T23:44:56+5:30

Leakage to IGM's building | आयजीएमच्या इमारतीला गळती

आयजीएमच्या इमारतीला गळती

googlenewsNext


इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाले असले तरी रुग्णालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अशा इमारती अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेल्या नाहीत. परिणामी इमारतींची डागडुजी झाली नसल्याने पावसाळ्यात इमारतींना गळती लागली आहे. तर तटबंदीच्या कुंपणभिंतीची पडझड झाल्यामुळे दवाखान्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
नगरपालिकेचे असलेले आयजीएम रुग्णालयाला दरवर्षी सुमारे अडीच कोटींहून अधिक रुपयांचा तोटा होऊ लागल्याने नगरपालिकेला रुग्णालय चालवणे आर्थिकदृष्ट्या आर्थिक अडचणीचे ठरले. त्यामुळे रुग्णालय शासनाने हस्तांतरित करून घ्यावे, असा प्रस्ताव नगरपालिकेने शासनासमोर ठेवला. रुग्णालय वर्ग करून घेण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनदरबारी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ३० जून २०१६ रोजी रुग्णालय शासनाकडे वर्ग करून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आयजीएम रुग्णालय २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाकडे वर्ग करून घेण्यात आले आणि त्या दिवशीपासून रुग्णालयाकडील बाह्यरुग्ण विभाग शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केला, असे असले तरी शासनाच्या आरोग्य खात्याकडे रुग्णालय व त्याकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्ग करून घेण्याची प्रक्रिया रखडली.
मार्च २०१७ अखेर नगरपालिकेने अधिकारी व कर्मचाºयांच्या पगाराची तरतूद केली होती; पण शासनाच्या आरोग्य खात्याकडे आयजीएम रुग्णालयाकडील अधिकारी व कर्मचाºयांच्या पगाराची तरतूद नसल्याने सुमारे नऊ महिने त्यांचे पगार झाले नाहीत. अखेर नऊ महिन्यांनंतर अधिकारी व कर्मचाºयांच्या पगाराची तरतूद करण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात रुग्णालयाकडील सर्व सेवा कोलमडून पडली.
शासनाने ‘आयजीएम’साठी पहिल्या टप्प्यात १५७ व दुसºया टप्प्यात ६३ पदांना मंजुरी दिली. त्यापैकी १४८ पदे अद्यापही रिक्त आहेत. अशा स्थितीमध्ये बाह्यरुग्ण विभाग, तसेच प्रसूती, अस्थिरोग, एक्स-रे, प्रयोगशाळा व काही शस्त्रक्रिया इतके विभाग ठरावीक मर्यादेपर्यंत सुरू आहेत. रुग्णालयाकडे मंजूर असलेल्या सर्व पदांची भरती झाली आणि आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री शासनाने उपलब्ध केली, तर हे रुग्णालय लवकरच आंतररुग्ण विभागाकडील २०० खाटांसह सुरू होईल, अशी माहिती दवाखान्याकडील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवीकुमार शेट्ये यांनी दिली.
तसेच रुग्णालयासाठी शासनाने सात लाख रुपये औषधासाठी मंजूर केले आहेत. नजीकच्या दोन-तीन आठवड्यांमध्ये दवाखान्यासाठी आवश्यक असलेली औषधे खरेदी केली जातील. ज्यामुळे रुग्णालयात सध्या देण्यात येणाºया उपचारापेक्षा अधिक चांगले उपचार रुग्णांना मिळू लागतील, असेही डॉ. शेट्ये यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी व दवाखान्याचे प्रभारी भरत शिंदे उपस्थित होते.
‘आयजीएम’ हस्तांतराची प्रक्रिया तुलनेने चांगली
इचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय शासनाने हस्तांतरित करून घेण्यापूर्वी मालेगाव, भिवंडी, मीरा भार्इंदर येथील रुग्णालये शासनाकडे वर्ग करण्यात आली आहेत.
तेथील रुग्णालयांची वर्ग करून घेण्याची रेंगाळलेली प्रक्रिया पाहता इचलकरंजीचे रुग्णालय वर्ग करून घेण्यामध्ये चांगली गती आहे, असेही डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

Web Title: Leakage to IGM's building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.