कोल्हापूरची ‘तितिक्षा’ एक्स्प्रेस--‘खेलो इंडिया’त चमकली -चमकते तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:54 PM2019-01-22T18:54:14+5:302019-01-22T19:00:55+5:30

भारताची आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेली स्प्रिंट क्वीन पी. टी. उषा हिच्यानंतर महाराष्ट्राच्या माणदेशी एक्स्प्रेस अर्थात ललिता बाबर हिने आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला. नुसता नोंदविला नाही तर त्यात सर्वोत्तम कामगिरीही केली.

Kolhapur's 'Tikitshah' Express - 'Play India' glows in glowing-light stars | कोल्हापूरची ‘तितिक्षा’ एक्स्प्रेस--‘खेलो इंडिया’त चमकली -चमकते तारे

कोल्हापूरची ‘तितिक्षा’ एक्स्प्रेस--‘खेलो इंडिया’त चमकली -चमकते तारे

googlenewsNext
ठळक मुद्देअल्पावधीत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई - आजपर्यंत मिळालेली पदके -- सुवर्ण १, रौप्य ६ कास्ट १४ तर खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदकाचा ललिता ने मान मिळविला आहे.

सचिन भोसले ।
कोल्हापूर : भारताची आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेली स्प्रिंट क्वीन पी. टी. उषा हिच्यानंतर महाराष्ट्राच्या माणदेशी एक्स्प्रेस अर्थात ललिता बाबर हिने आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला. नुसता नोंदविला नाही तर त्यात सर्वोत्तम कामगिरीही केली. तिच्या पावलावर पाऊल ठेवत आता कोल्हापूरची तितिक्षा पाटोळे हीही ‘कोल्हापूर एक्स्प्रेस’ म्हणून आपली नवी ओळख निर्माण करीत आहे. तिने अल्पावधीतच ‘खेलो इंडिया’अंतर्गत ४०० मीटर धावणेमध्ये सांघिक प्रकारात राज्याला कांस्यपदक मिळवून देत केरळनंतर महाराष्ट्राच्या मुलीही मैदानी स्पर्धेत आहेत, याची देशाला जाणीव करून दिली.

तीन वर्षांपूर्वी ‘सेव्हंथ डे’ या तिच्या स्कूलतर्फे जिल्हास्तरीय ४०० मीटर धावणे स्पर्धेत तिने वैयक्तिक द्वितीय क्रमांक पटकाविला. हे तिचे यश तिला ‘धावणे’सारख्या मैदानी स्पर्धेकडे खेचून गेले. त्यानंतर घरात आई दिव्या व वडील युवराज यांना तितिक्षाचा मैदानी स्पर्धेकडील कल जाणवला. आवड बघून वडील युवराज यांनी बाळराजे स्पोर्टस्चे अ‍ॅथलेटिक प्रशिक्षक जालंदर मेढे यांच्याकडे दाखल केले. तेथील मुलामुलींच्या सरावात तिची तयारी चांगली झाली. त्यात आठवीमध्ये तिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी कनिष्ठ गटात ६०० मीटरमध्ये पहिलेवहिले राज्य पातळीवरील कांस्यपदक पटकाविले. नववीमध्ये असताना जिल्हा अ‍ॅथलेटिक्सच्या खुल्या गटात तिने ४०० मीटर धावण्यामध्ये ५९ सेकंदांची आश्चर्यकारक वेळ नोंदविली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ मैदानावर दररोजचे सरावाचे वेळापत्रक ठरले. त्यानुसार दुपारी चार ते सात वाजेपर्यंत सराव सुरू झाला. नुकत्याच पुणे येथील बालेवाडी क्रीडाग्राममध्ये झालेल्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात राज्याचे प्रतिनिधित्व करीत ४०० बाय ४०० मीटर स्पर्धेत तिने केरळच्या दोन मुलींना मागे टाकीत कांस्यपदक मिळवून दिले. त्यामुळे येत्या काळात युवा आशियाई, आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कोल्हापूरची ही ‘तितिक्षा एक्स्प्रेस’ नक्कीच देशाचे नाव करील.

इथे गती मिळाली
शाळेत शारीरिक शिक्षक रूपेश सनदे यांनी सातवीत असताना जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी कोण उत्सुक आहेत का? असा सवाल वर्गात केला. क्षणाचाही विलंब न करता ‘तितिक्षा’ने हात वर केला. त्यानंतर रुईकर कॉलनीच्या मैदानावर सरावास सुरुवातही केली. महिनाभराची तयारी झाल्यानंतर तिने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर पुढे अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि आता ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. शाळेतील शिक्षकांकडूनची विचारणा हा तिच्या आयुष्यातील मैदानी स्पर्धेला गती देणारा क्षण ठरला. पुढे आई दिव्या व वडील युवराज यांनी तिच्यासाठी सायंकाळचा वेळ काढून सरावाला प्राधान्य दिले.
 

मला पुन्हा एकदा देशाची दुसरी पी. टी.उषा, ललिता बाबर व्हायला आवडेल. या खेळात मायक्रो सेकंदचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे सराव हाच माझ्यासाठी एक बूस्टर आहे.
- तितिक्षा पाटोळे, राष्ट्रीय धावपटू, कोल्हापूर

तितिक्षाची खेळातील आवड, सराव आणि प्रशिक्षक जालंदर मेढे यांचे मार्गदर्शन यांमुळे ती नक्कीच देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करेल.
- युवराज पाटोळे,
तितिक्षाचे वडील

 



 

Web Title: Kolhapur's 'Tikitshah' Express - 'Play India' glows in glowing-light stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.