कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:58 AM2017-11-22T00:58:43+5:302017-11-22T01:03:21+5:30

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे.

 Kolhapur's 'Rahul' will be the only new year, Congress president of district party: Satej Patil insists; P. N. Cautious | कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध

कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध

Next
ठळक मुद्दे जिल्हाध्यक्ष होणे कोणालाही सोपे नाही. प्रकाश आवाडे यांनीही अजून प्रयत्न सोडलेले नाहीत.सतेज पाटील यांनी उघड दंड थोपटले आहेत.पी. एन. पाटील यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या काँग्रेसचा राहुल गांधी कोण, हे नव्या वर्षातच ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील यांनी उघड दंड थोपटले आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही अजून प्रयत्न सोडलेले नाहीत. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध पाहता, त्यांनाही कमी लेखणे चुकीचे ठरेल. सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी जरी प्रयत्न सुरू केले असले तरी जिल्हाध्यक्ष निवडताना माजी आमदार पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या सतरा वर्षांहून अधिक काळ ते जिल्हाध्यक्ष आहेत. कॉँग्रेसच्या फुटीनंतर १९९९ मध्ये त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकदीने मोट बांधून राष्टÑवादी कॉँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना टक्कर दिली. त्यामुळे त्यांना वगळून जिल्हाध्यक्ष होणे कोणालाही सोपे नाही. त्यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत. कॉँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी ४ डिसेंबरला नामनिर्देशन दाखल करायचे आहे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ती औपचारिकता ९ डिसेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत.

आवळेंचे नावही पुढे येण्याची शक्यता
सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी ताकद लावली तर पी. एन. पाटील हे जयवंतराव आवळे यांचे नाव पुढे करून दोघांनाही शांत करू शकतात. आवळे यांचे प्रदेश कॉँग्रेसमधील वजन पाहता त्यांना थेट विरोध करणेही अवघड होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

महत्त्वाचे पद
आगामी दोन वर्षांत लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चित करताना जिल्हाध्यक्षांचे मत महत्त्वाचे असते. त्यानिमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करता येते. त्यामुळे या पदासाठी मातब्बर फिल्डींग लावू शकतात.

Web Title:  Kolhapur's 'Rahul' will be the only new year, Congress president of district party: Satej Patil insists; P. N. Cautious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.