‘तरण्या’ नक्षत्रात कोल्हापूरात वळिवासारखा अर्धा तास पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:01 AM2019-07-20T11:01:48+5:302019-07-20T11:04:02+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. तीन दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर ऐन ‘तरण्या’ नक्षत्रात वळिवासारखा अर्धा तास ...

Kolhapur was overwhelmed by rain | ‘तरण्या’ नक्षत्रात कोल्हापूरात वळिवासारखा अर्धा तास पाऊस

‘तरण्या’ नक्षत्रात कोल्हापूरात वळिवासारखा अर्धा तास पाऊस

Next
ठळक मुद्देकोल्हापूरला पावसाने झोडपले‘तरण्या’ नक्षत्रात कोल्हापूरात वळिवासारखा अर्धा तास पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. तीन दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर ऐन ‘तरण्या’ नक्षत्रात वळिवासारखा अर्धा तास पाऊस कोसळला. जिल्ह्यातही काही ठिकाणी या पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजता शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली. सुमारे अर्धा तास पावसाने झोडपून काढले. वळिवासारखाच पाऊस झाला असला तरी तीन दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला.

धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राधानगरी धरण ७३ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेंकद ८०० घनफूट विसर्ग सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाली असून, पंचगंगा १७.७ फुटांपर्यंत खाली आली आहे.

 

Web Title: Kolhapur was overwhelmed by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.