कोल्हापूर : प्रज्ञान कलाच्या वारणा नाट्यमहोत्सवास प्रतिसाद, दिलीप जगताप यांची नाटके सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 08:42 PM2018-03-06T20:42:35+5:302018-03-06T20:43:00+5:30

वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महोत्सवात सांगली येथील नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांची दलदल (दिग्दर्शक पद्मनाभ पोवार) व बें बें बकरी (दिग्दर्शक अनिकेत ढाले) आणि अटक मटक, चवळी चटक (दिग्दर्शक नीलेश आवटी) ही बालनाट्ये सादर करण्यात आले.

Kolhapur: Varna Natya Mahotsav Response of Pragyan Kala, Dilip Jagtap plays plays. | कोल्हापूर : प्रज्ञान कलाच्या वारणा नाट्यमहोत्सवास प्रतिसाद, दिलीप जगताप यांची नाटके सादर

वारणानगर येथील नाट्यमहोत्सवात ‘अटक मटक, चवळी चटक’ हे नाटक ‘प्रज्ञान’च्या बालकलाकारांनी सादर केले.

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रज्ञान कलाच्या वारणा नाट्यमहोत्सवास प्रतिसादवारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित नाट्यमहोत्सव

कोल्हापूर : वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.


वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा निपुण कोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा पडदा उघडला.

दोन दिवसांच्या या नाट्यमहोत्सवात सांगली येथील नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांची दलदल (दिग्दर्शक पद्मनाभ पोवार) व बें बें बकरी (दिग्दर्शक अनिकेत ढाले) आणि अटक मटक, चवळी चटक (दिग्दर्शक नीलेश आवटी) ही बालनाट्ये सादर करण्यात आले.


वारणानगर येथील नाट्यमहोत्सवात सादर झालेल्या नाटकातील एक प्रसंग.

महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रा. दिलीप जगताप यांनी वारणा बालवाद्यवृंदाचे स्मरण करत, प्रज्ञानच्या बालकलाकारांनी सादर केलेल्या बालनाट्याचे कौतुक केले. ग्रामीण नाट्यक्षेत्रात या नाटकांमुळे नव्या पर्वाची सुरुवात झाली असून ग्रामीण बालनाट्य चळवळीची ही नांदी आहे, असे मत व्यक्त केले.

मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्रा. दिलीप जगतापांची नाटके वारणेत सादर होणे हे अभिमानास्पद आहे व त्यादृष्टीने हा महोत्सव एक ऐतिहासिक घटना आहे, असे मत सचिव नीलेश आवटी यांनी व्यक्त केले. वारणा नाट्यमहोत्सवाची प्रेरणा ही तरुणपिढीला, शाळा-कॉलेजमध्ये नाट्यकला सादर करण्यास प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अध्यक्ष रमेश हराळे यांनी व्यक्त केला.

यावेळी स्नेहल कुलकर्णी, विकास मिनेकर (दलदल) प्रणिता भिंताडे व धनंजय माने (बें बें बकरी) यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. अकादमी भविष्यात नाट्यमहोत्सव, चित्रपट महोत्सव भरविणार असल्याची माहिती समारोपप्रसंगी उपाध्यक्षा नेहा आवटी यांनी दिली. यावेळी केदार सोनटक्के यांच्या हस्ते कामगार कल्याण मराठी नाट्य स्पर्धेमध्ये प्रकाश योजनेत द्वितीय क्रमांक (दलदल) मिळविलेल्या विनायक सुतार यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अमित माळी, प्रमोद कोरे, प्रा. टी. बी. राठोड, अनिल यादव, तानाजी शिंदे, वर्षा हराळे, माधवी आवटी, अंबिका चौगुले, हेमलता बोरकर, लक्ष्मण द्रविड, शुभांगी तावरे, अक्षय थोरात, तेजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Varna Natya Mahotsav Response of Pragyan Kala, Dilip Jagtap plays plays.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.