कोल्हापूर : लहान मुलांच्या भांडणावरून शाहू बँक परिसरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:58 PM2018-09-21T13:58:08+5:302018-09-21T14:00:28+5:30

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मंगळवार पेठ येथील शाहू बँक परिसरातील दोन मंडळांत गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास वाद झाला. पण, पोलीस आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करून तो मिटविला. या प्रकारामुळे तिथे अर्धा तास तणाव होता.

Kolhapur: Stress in Shahu Bank area due to child conflict | कोल्हापूर : लहान मुलांच्या भांडणावरून शाहू बँक परिसरात तणाव

कोल्हापूर : लहान मुलांच्या भांडणावरून शाहू बँक परिसरात तणाव

Next
ठळक मुद्दे लहान मुलांच्या भांडणावरून शाहू बँक परिसरात तणावज्येष्ठ नागरिकांनी वाद मिटविला; दोन मंडळांतील प्रकार

कोल्हापूर : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मंगळवार पेठ येथील शाहू बँक परिसरातील दोन मंडळांत गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास वाद झाला. पण, पोलीस आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करून तो मिटविला. या प्रकारामुळे तिथे अर्धा तास तणाव होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून मंगळवार पेठ परिसरातील दोन मंडळांतील लहान मुलांमध्ये वाद सुरू आहे. त्याचे पर्यवसान गुरुवारी रात्री दोन मंडळांतील वादामध्ये झाले. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. हा प्रकार समजताच जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी आले.

सध्या गणेशोत्सव देखाव्यांमुळे या मार्गावर गर्दी आहे. पोलीस आल्याचे पाहताच देखावे पाहण्यास आलेल्या नागरिकांना नेमका काय प्रकार झाला, हे समजेना. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले.

पोलीस शाहू बँक परिसरातील या दोन्ही मंडळांकडे या वादाबाबत चौकशी करीत असताना तिथे काही ज्येष्ठ नागरिक आले. त्यांनी दोन्ही मंडळांमध्ये मध्यस्थी करून हा वाद मिटविला; पण पोलिसांनी या वादाप्रकरणी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांना सोडून देण्यात आले.
 

 

Web Title: Kolhapur: Stress in Shahu Bank area due to child conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.