कोल्हापूर : गर्दीनेच ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ चा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:55 PM2018-06-08T17:55:59+5:302018-06-08T17:56:13+5:30

‘तुमचे यश हेच आमचे ध्येय!’ हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी होत असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला कोल्हापुरातील विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने शुक्रवारी प्रारंभ झाला.

Kolhapur: The start of the 'Lokmat Aspire Education Fair' in the crowd | कोल्हापूर : गर्दीनेच ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ चा प्रारंभ

कोल्हापूर : गर्दीनेच ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ चा प्रारंभ

Next
ठळक मुद्देगर्दीनेच ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ चा प्रारंभविद्यार्थी, पालकांचा उर्त्स्फूत प्रतिसादकरिअर विषयक अचूक मार्गदर्शन एकाच छताखाली

कोल्हापूर : ‘तुमचे यश हेच आमचे ध्येय!’ हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी होत असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला कोल्हापुरातील विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने शुक्रवारी प्रारंभ झाला.

शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला, सर्वव्यापी उपायांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर’ला पहिल्याच दिवशी उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.

शनिवारी आणि  रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक युनिक अकॅडमी, तर सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह आणि देसाई अकॅडमी आहे.

येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनातील या प्रदर्शनाचे उद्घाटन वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, देसाई अकॅडमीचे संचालक महेश देसाई प्रमुख उपस्थित होते. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, उपसरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील यांनी रोप देवून केले.

यावेळी ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, इव्हेंट विभागप्रमुख दीपक मनाठकर उपस्थित होते. सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर प्रमुख उपस्थितांनी ‘लोकमत अ‍ॅस्पायर’ प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ‘लोकमत’ चे शैक्षणिक प्रदर्शन असलेल्या ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून करिअर विषयक माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाल्यापासून विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली.

विविध नामांकित शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत होते. स्टॉलधारक त्यांना माहितीपत्रक, चित्रफितीद्वारे अभ्यासक्रम व आपल्या संस्थेची माहिती देत होते. दहावीचा निकाल दुपारी जाहीर झाल्यानंतर प्रदर्शनातील गर्दीमध्ये वाढ झाली.

प्रदर्शनातून माहिती घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येत होते. दरम्यान, प्रदर्शनातील सायंकाळच्या सत्रात विज्ञानावर आधारित प्रश्नांवरील ‘सायन्स पंडित’ परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागला. देसाई अकॅडमीचे महेश देसाई यांनी बारावी, जेईई, नीट, एनडीए परीक्षेची तयारी याविषयावर मार्गदर्शन केले.

शनिवारी प्रदर्शनात

  1.  सकाळी ११ वाजता : चारूदत्त रणदिवे यांचे मार्गदर्शन (संमोहन व व्यक्तिमत्त्व विकास)
  2.  दुपारी १२ वाजता : डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रो. बी. व्ही. बिराजदार (इंजिनिअरिंग- इट्स ब्रँचेस अ‍ॅँड कॅप अ‍ॅडमिशन प्रोसेस)
  3. दुपारी १ वाजता : साहील चोपडे यांचे मार्गदर्शन (करिअर इन नेव्ही)
  4. दुपारी ४ वाजता : डॉ. जयदीप बागी (होलिस्टिक अ‍ॅप्रोच टुवर्डस एज्युकेशन)
  5. सायंकाळी ५ वाजता : एंट्रन्स टेस्ट फॉर एमबीबीएस- अ‍ॅब्रॉड
  6.  सायंकाळी ६ वाजता : कामेंद्र दहात यांचे मार्गदर्शन (स्टडी अँड वर्क अ‍ॅब्रॉड)

 

Web Title: Kolhapur: The start of the 'Lokmat Aspire Education Fair' in the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.