कोल्हापूर : निपाणीच्या सुशीला नाईक यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, पी. ए. गवळी यांची माहिती, बुधवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:08 PM2017-12-30T18:08:43+5:302017-12-30T18:10:53+5:30

यंदाचा आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार निपाणी येथील देवदासी, जटानिर्मूलन आणि विडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि. ३) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वा. होणार असल्याची माहिती आबाजी सुबराव आणि आकुबाई आबाजी गवळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्राचार्य पी. ए.ग् ावळी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

Kolhapur: Social gratitude award to Sushila Naik of Nipani, P. A. Gawali's information, distribution on Wednesday | कोल्हापूर : निपाणीच्या सुशीला नाईक यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, पी. ए. गवळी यांची माहिती, बुधवारी वितरण

कोल्हापूर : निपाणीच्या सुशीला नाईक यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, पी. ए. गवळी यांची माहिती, बुधवारी वितरण

Next
ठळक मुद्दे११ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूपविडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना पुरस्कार आबाजी सुबराव, आकुबाई आबाजी गवळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार

कोल्हापूर : यंदाचा आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार निपाणी येथील देवदासी, जटानिर्मूलन आणि विडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि. ३) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वा. होणार असल्याची माहिती आबाजी सुबराव आणि आकुबाई आबाजी गवळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्राचार्य पी. ए. गवळी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

गवळी म्हणाले, यंदाचे पुरस्काराचे हे २६ वे वर्ष आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना व गोरगरीब वंचितांसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येते. आबाजी सुबराव आणि आकुबाई आबाजी गवळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार नाईक यांना देण्यात येणार आहे.

औपचारिक शिक्षण वाट्याला न आलेल्या व देवदासी असलेल्या सुशीला नाईक यांनी देवदासींच्या समस्या व त्यांच्या निर्मूलनासाठी काम केले. त्यांनी सावली देवदासी पुनर्वसन केंद्र उभे केले. या केंद्रामार्फत ठिकठिकाणी स्वस्त धान्य दुकाने आणि पाळणाघर चळवळ चालविली. आज त्यांची ५९ वर्षे झाली आहेत. त्यांना ११ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्यिक व विचारवंत लेखक राजा शिरगुप्पे, मंत्रालयाचे माजी सहसचिव सुरेश सोनावणे व सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव संजय भोसले, आदी मान्यवर वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बैठकीस सचिव प्रा. प्रज्ञावंत गौतम, सहसचिव प्रशांत गवळी, दिलीप गवळी, प्रफुल्ल गवळी, प्रवीण गवळी, आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur: Social gratitude award to Sushila Naik of Nipani, P. A. Gawali's information, distribution on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.