कोल्हापूर :  शाहूंच्या समाधिस्थळावरून राजकीय फुलांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:47 PM2019-01-10T12:47:54+5:302019-01-10T12:50:44+5:30

ज्यांच्या पुण्याईवर केवळ कोल्हापूर जिल्हाच विकसित झाला नाही, तर देशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातही मोठी उन्नती झाली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय फुलांची उधळण करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला.

Kolhapur: Political Flowers Extinction from the Shahu Samadhi | कोल्हापूर :  शाहूंच्या समाधिस्थळावरून राजकीय फुलांची उधळण

कोल्हापूर :  शाहूंच्या समाधिस्थळावरून राजकीय फुलांची उधळण

Next
ठळक मुद्देशाहूंच्या समाधिस्थळावरून राजकीय फुलांची उधळणमहापालिका सभेत उद्वेगजनक प्रकार : आरोप- प्रत्यारोपांचे गालबोट

कोल्हापूर : ज्यांच्या पुण्याईवर केवळ कोल्हापूर जिल्हाच विकसित झाला नाही, तर देशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातही मोठी उन्नती झाली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय फुलांची उधळण करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला. या उद्वेगजनक प्रकाराने काही नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अखेर तासभराच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर भानावर आलेल्या नगरसेवकांनी झाले गेले विसरून समाधिस्थळाच्या बांधकामाचा पाठपुरावा करण्याचा संकल्प केला.

शाहू समाधिस्थळाकरिता द्याव्या लागणाऱ्या निधीच्या मंजुरीसाठी महापौर सरिता मोरे यांनी बुधवारी विशेष सभा आयोजित केली होती. सभेत ७० लाखांचा निधी देण्याच्या प्रस्तावास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली; परंतु या विषयावर झालेल्या चर्चेतून अवमान आणि गैरसमज झाले. त्यातून सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडी असे दोन गट पडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. वास्तविक विषय मंजूर करून चर्चेशिवाय सभा संपविणे आवश्यक होते किंवा चर्चा करत असताना दुसऱ्याचा अवमान होणार नाही याची खबरदारी राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी घ्यायला पाहिजे होती, ती न घेतल्याने कृतघ्नपणाचे दर्शन सभागृहाला झाले.

महापालिकेने समाधिस्थळ स्वनिधीतून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही त्याच्या कामास राज्य सरकारने तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी दिला नाही, असा राजकीय आरोप कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यातच उपमहापौर भूपाल शेटे यांनी सरकार जर काही देणार नसेल, तर आपण ‘झोळी’ घेऊन पैसे गोळा करू आणि समाधिस्थळ बांधून पूर्ण करू, असे सांगितले.

शेटे यांच्या या वक्त्यव्यावरून सभेत ठिणगी पडली. त्यांच्या वक्तव्यावर हरकत घेत सत्यजित कदम, सुनील कदम, विलास वास्कर, राजसिंह शेळके, किरण शिराळे, किरण नकाते यांनी हरकत घेतली. शब्द मागे घ्या, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. तसेच शाहू महाराजांच्या समाधिस्थळासाठी ‘झोळी’ घेऊन का पैसे मागायचे, सरकार आणि महापालिका निधी देण्यासाठीच आहेत.

शाहू महाराजांचा अवमान होईल, असे कोणतेही वक्तव्य करू नका, अशी समज दिली. माजी महापौर हसिना फरास यांनीही शेटे यांना तुमचा शब्द मागे घ्या, अशी सूचना केली. त्यानंतर तत्काळ शेटे यांनी दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकला. आपणाला लोकसहभागातून समाधिस्थळ विकसित करू, असे म्हणायचे होते, असा खुलासा त्यांनी केला.
विरोधी बाकावरील सदस्य तरीही शांत झाले नाहीत. सत्यजित कदम यांनी तर तुम्ही सरकारकडे कधी प्रस्ताव पाठविला, पालकमंत्र्यांकडे कधी चर्चेला गेला सांगा, असे आव्हान दिले; त्यामुळे सत्तारूढ गटाचे शारंगधर देशमुख यांनाही स्वत:ला आवरता आले नाही.

समाधिस्थळासाठी सरकारने चार आणे दिलेले नाहीत. निधी मागायचा कशाला? हवा त्यांना द्यावा असे का वाटले नाही? त्यांना लाज कशी वाटली नाही? भाषणात १0 वेळा शाहू महाराज यांचे नाव घेता, तर मग निधी द्यायला कमीपणा कसला वाटतो? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सभेतील वादंग अधिकच वाढले. शेवटी विरोधी गटाच्या सर्व सदस्यांनी राजकीय संघर्ष टाळण्याकरिता समाधिस्थळाच्या निधीला मंजुरी देऊन सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांना नंतर रोखण्याचा प्रयत्न झाला; परंतु सर्वांनी सभागृह सोडले.

विरोधी गटाचे नगरसेवक पुन्हा सभागृहात

विरोधी गटाचे सर्व नगरसेवक सभागृहातून बाहेर पडल्याचे लक्षात येताच, माजी स्थायी सभापती आदिल फरास, महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार मोरे धावतच महापालिका चौकात गेले. त्यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

शाहू महराजांच्या समाधिस्थळाचा विषय आहे, तुम्ही सभागृहातून बाहेर पडणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांची समजूत काढली. त्याचवेळी हसिना फरास यादेखील चौकात आल्या. महाराजांचा अवमान होईल, असे कोणी वागू नका, असे फरास यांनी सांगितले. कोणतीही चर्चा, राजकीय आरोप करायचे नाहीत, या अटींवर नगरसेवक पुन्हा सभागृहात पोहोचले.

हसिना फरास ‘आई’च्या भूमिकेत

माजी महापौर हसिना फरास यांनी समाधिस्थळाच्या कामाचा सतत पाठपुरावा करत आहोत. बुधवारच्या सभेत सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने व्यथित झालेल्या फरास यांनी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना समजावले. किमान समाधिस्थळाच्या कामावरून तरी एकमेकांवर आरोप करू नका, अशा शब्दांत बजावले. एवढेच नाही तर त्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हातातील माईक काढून घेऊन तुमचे वक्तव्य बरोबर नाही, शब्द मागे घ्या, असे सांगितले. वेगळे वळण लावायला नको, एकमताने विषय मंजूर करा, शांत बसा, असेही त्यांनी अधिकारवाणीने सर्वांना सांगितले.

मृत्यू झालेल्या ठिकाणची माती

राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज परिसरातील माती आणलेला कलश आदिल फरास, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत यांनी महापौर मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. ही समाधिस्थळाच्या ठिकाणी दगडी पेटीत ठेवली जाणार आहे.

 

Web Title: Kolhapur: Political Flowers Extinction from the Shahu Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.