कोल्हापूर : वाचनामुळे व्यक्तिमत्त्व घडते : हिरळीकर, बाल वाचन संस्कार शिबिराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:43 AM2018-05-05T11:43:24+5:302018-05-05T11:43:24+5:30

स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रजनी हिरळीकर यांनी व्यक्त केले. करवीर नगर वाचन मंदिरामध्ये बालवाचन संस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

Kolhapur: Personality happens because of the reading: It is clear that the reading of Balakrishna, Bal Wearing Sanskar Camp | कोल्हापूर : वाचनामुळे व्यक्तिमत्त्व घडते : हिरळीकर, बाल वाचन संस्कार शिबिराची सांगता

 कोल्हापुरातील करवीर नगर वाचन मंदिरातील बाल वाचन संस्कार शिबिरातील समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना मनीषा वाडीकर. सोबत रजनी हिरळीकर, नंदकुमार मराठे, डॉ. संजीवनी तोफखाने, मनीषा शेणई उपस्थित होत्या.

Next
ठळक मुद्देवाचनामुळे व्यक्तिमत्त्व घडते : हिरळीकरबाल वाचन संस्कार शिबिराची सांगता

कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रजनी हिरळीकर यांनी व्यक्त केले.
करवीर नगर वाचन मंदिरामध्ये बालवाचन संस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

या शिबिरात मुलांनी बालनाटिका, बालकविता सादर केली; तर चित्रकला स्पर्धेतील व उत्कृृष्ट वाचन करणाऱ्या मुलांना पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. संजीवनी तोफखाने यांनी प्रास्ताविक केले; तर मनीषा वाडीकर यांनी आभार मानले. याप्रसंगी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, प्रशांत वेल्हाळ, मनीषा शेणई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Personality happens because of the reading: It is clear that the reading of Balakrishna, Bal Wearing Sanskar Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.