कोल्हापुरात खेळणी व्यावसायिकाचा खून, पत्नीची छेड काढल्याचा रागातून कृत्य, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:28 PM2017-12-02T17:28:42+5:302017-12-02T17:51:08+5:30

पत्नीची छेड काढल्याच्या रागातून खेळणी व्यावसायिकाचा चाकुने भोकसुन खून केला. समीर बाबासो मुजावर (वय ३०, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अनिल रघुनाथ धावडे (३२, रा. ओमकार टॉवर्स, बागल चौक) याला शाहुपूरी पोलीसांनी अटक केली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

In Kolhapur, the murder of a toy businessman, the act of resentment of his wife, and the arrest of the accused | कोल्हापुरात खेळणी व्यावसायिकाचा खून, पत्नीची छेड काढल्याचा रागातून कृत्य, आरोपीस अटक

कोल्हापुरात खेळणी व्यावसायिकाचा खून, पत्नीची छेड काढल्याचा रागातून कृत्य, आरोपीस अटक

Next
ठळक मुद्देपत्नीची छेड काढल्याच्या रागातून खेळणी व्यावसायिकाचा चाकुने भोकसुन खून अनिलची पत्नी नोकरीवर जात असताना संशयित तिच्या मागे, वारंवार छेड सीपीआरमध्ये संशयित अनिलला ताब्यात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून खेळणी व्यावसायिकाचा चाकुने भोसकून खून केला. समीर बाबासो मुजावर (वय ३०, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अनिल रघुनाथ धावडे (३२, रा. ओमकार टॉवर्स, बागल चौक) याला शाहुपूरी पोलीसांनी अटक केली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.


शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनिल धावडे हा नोकरी करतो. बागल चौकात मामाच्या घरी पत्नी व दोन मुलींसह राहतो. त्याची पत्नी खासगी नोकरी करते. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत महेश भटेजा यांचे खेळण्याचे दुकान आहे. ते समीर मुजावर याने चालविण्यास घेतले होते.

अनिल याची पत्नी नोकरीवर जात असताना तो तिच्या मागे लागत वारंवार छेड काढत होता. गेल्या तीन वषार्पासून तो त्रास देत होता. त्यांच्या घराजवळून दूचाकीवरुन जात असे. समीर त्रास देत असल्याची तक्रार पत्नीने केल्याने अनिलने रस्त्यात आडवून दोन वेळा त्याला समज दिली होती. चार दिवसापूर्वी त्याने पुन्हा छेड काढली होती. त्याचा राग अनिलच्या मनात होता.


शनिवारी सकाळी समीर संशयित अनिलच्या घरासमोर आला. तो घराकडे पहात जात होता. यावेळी गॅलरीत उभ्या असलेल्या अनिलने त्याला काय पाहतोस अशी विचारणा केली. यावेळी दूचाकी थांबवून समीर त्यांच्या घरात घुसला. दरवाजासमोर त्यांचेत हाणामारी झाली.

यावेळी संतापलेला अनिलने घरातील चाकु घेवून समीरला भोसकले. त्याच्या पोटात डाव्या बाजुला खोलवर वार होवून तो कोसळला. येथून जाणारे नागेश शिखरे याने हा प्रकार पाहिला. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


संशयित अनिल धावडे हा पाठोपाठ सीपीआरमध्ये आला. येथील डॉक्टरांना मी वार केला आहे. तो जिवंत नाही नव्हे अशी विचारणा केली. हे ऐकून डॉक्टरांनी सीपीआर पोलीस चौकीतील हवालदार पी. के. जाधव व कॉन्स्टेबल कृष्णा काकडे यांना बोलविले. त्यांनी तत्काळ लक्ष्मीपूरी पोलीसांकडे मदत मागितली.

पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सीपीआरमध्ये येवून संशयित अनिलला ताब्यात घेतले. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: In Kolhapur, the murder of a toy businessman, the act of resentment of his wife, and the arrest of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.