कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून दोघा भावांवर खूनी हल्ला, सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:16 PM2018-09-24T16:16:01+5:302018-09-24T16:17:29+5:30

पूर्व वैमन्स्यातून गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यास आलेल्या दोघा भावांवर सहा जणांनी चाकु व काठीने खूनी हल्ला केला. यज्ञेश सुभाष पवार (वय १७, रा. तिनबत्ती चौक, दौलतनगर), त्याचा भाऊ आशिष (२०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांचेवर सीपआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Kolhapur: A murder case was registered against two brothers from East Vamans and six offenses | कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून दोघा भावांवर खूनी हल्ला, सहा जणांवर गुन्हा

कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून दोघा भावांवर खूनी हल्ला, सहा जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देपूर्व वैमन्स्यातून दोघा भावांवर खूनी हल्ला सहा जणांवर गुन्हा : अर्धशिवाजी पुतळा येथील घटना

कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यास आलेल्या दोघा भावांवर सहा जणांनी चाकु व काठीने खूनी हल्ला केला. यज्ञेश सुभाष पवार (वय १७, रा. तिनबत्ती चौक, दौलतनगर), त्याचा भाऊ आशिष (२०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांचेवर सीपआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना रविवार (दि. २३) दूपारी दोनच्या सुमारास अर्धशिवाजी पुतळा ते गांधी मैदान रोडवर घडली.

याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीसांनी संशयित प्रशांत यशवंत मळगेकर, आकाश आनंदा मळगेकर, शुभम गाडीवड्डर, महेश चंद्रकांत हिंडलकोपे, आकाश बिरु ठाकुर, विशाल कुराडे (सर्व रा. दौलतनगर) यांचेवर गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी, फिर्यादी आशिष पवार व संशयित दौलनगरमध्ये राहतात. त्यांचेमध्ये पूर्वीपासून वाद आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी एकमेकाकडे बघण्यावरुन वाद झाला होता. याप्रकरणी राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आशिष व त्याचा भाऊ यज्ञेश व संशयित रविवारी दूपारी गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी अर्धशिवाजी पुतळा येथे आले होते.

यावेळी संशयितांनी यज्ञेशला तु सकाळी लय बोलत होतास आता बोल असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी प्रशांत मळगेकर याने कंबरेजवळ ठेवलेला चाकु काढून यज्ञेशच्या कपाळावर, नाकावर वार केले. तसेच आशिषला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयित तेथून निघून गेले. या दोघां भावांनी सीपीआरमध्ये उपचार घेत पोलीसांत फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: A murder case was registered against two brothers from East Vamans and six offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.