कोल्हापूर : मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:54 PM2018-10-16T16:54:56+5:302018-10-16T16:55:55+5:30

दिलबहार तालीम मंडळ येथील साईमंदिराबाहेर मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघा तरुणांना सोमवारी (दि. १५) अटक केली.

Kolhapur: Mobile theft on the moped cabin arrests the three | कोल्हापूर : मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटक

कोल्हापूर : मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटक

Next
ठळक मुद्देमोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटकफिर्यादीनुसार पोलिसांनी केली कारवाई

कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळ येथील साईमंदिराबाहेर मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघा तरुणांना सोमवारी (दि. १५) अटक केली.

संशयित विवेक विजय सरोदे (वय १९, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली), रवी कैलास खरबडे (१९, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली), महेश मधुकर नलवडे (१९, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, प्रेम विजय खाडे (वय २८, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) हे रविवारी (दि. १४) दिलबहार तालीम मंडळ येथील साईमंदिराबाहेर मित्र अवधूत शिंदे यांच्याशी बोलत थांबले होते.

यावेळी त्यांनी मोबाईल मोपेडच्या दुचाकीवर ठेवला होता. समोरून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
 

 

Web Title: Kolhapur: Mobile theft on the moped cabin arrests the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.