कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’; रविवारी विद्यापीठात होणार प्रॅक्टिस रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:01 PM2018-12-14T13:01:52+5:302018-12-14T13:05:12+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वातील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहभागी नागरिकांचा धावण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने रविवारी (दि. १६) शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात पाच किलोमीटर प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करणाऱ्या नागरिकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.

Kolhapur: 'Lokmat Mahamarethan'; Practice Run to be held on Sunday | कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’; रविवारी विद्यापीठात होणार प्रॅक्टिस रन

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’; रविवारी विद्यापीठात होणार प्रॅक्टिस रन

ठळक मुद्दे ‘लोकमत महामॅरेथॉन’; रविवारी विद्यापीठात होणार प्रॅक्टिस रनस्पॉट नावनोंदणीला विशेष सवलत

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वातील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहभागी नागरिकांचा धावण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने रविवारी (दि. १६) शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात पाच किलोमीटर प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करणाऱ्या नागरिकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील पहिल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला होता. यंदा ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या महामॅरेथॉनमधील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच नावनोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.

दैनंदिन जीवनात प्रत्येकजण तंदुरुस्त राहावा, या हेतूने या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांना स्पर्धेच्या मार्गाचा सराव व्हावा, धावताना कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबरोबरच धावण्याच्या विविध टिप्सही तज्ज्ञांकडून यावेळी देण्यात येणार आहेत.

ही ‘प्रॅक्टिस रन’ सर्वांसाठी मोफत खुली आहे. सहभागी प्रत्येक नागरिकाला येथील मार्गावर एनर्जी ड्रिंक, पिण्याचे पाणी तसेच फलाहार देण्याची सोय केली आहे. तरी या प्रॅक्टिस रनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मोबाईल नंबर ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर संपर्क साधावा.

असे आहेत गट

महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त वर्षांवरील) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटरची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे.

विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटवर नावनोदणी करावी किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा व नोंदणी करावी. नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे. महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

  1.  प्रॅक्टिस रनमध्ये मिळणार रनिंगच्या टिप्स
  2.  स्पॉट नोंदणीला विशेष सवलत
  3.  निसर्गरम्य परिसरात धावण्याचा सराव
  4. एनर्जी ड्रिंक, पिण्याचे पाणी तसेच फलाहाराची सोय
  5. प्रॅक्टिस रनमध्ये मोफत सहभागाची संधी.

 


मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात आपण पायी चालणे, धावणे पूर्णपणे विसरलो आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने कोल्हापुरात पळण्याची उत्कृ ष्ट संधी मिळाली आहे. धावण्यामुळे हाडे मजबूत होतात, नैराश्य कमी होते, त्यामुळे धावणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. मॅरेथॉनमुळे आपल्या सर्वांना अनोखी संधी मिळाली आहे. तिचा फायदा आपण सर्वांनीच घ्यावा.
- सुभाषचंद्र देसाई,
मोटार वाहन निरीक्षक
 

 

Web Title: Kolhapur: 'Lokmat Mahamarethan'; Practice Run to be held on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.