कोल्हापूर :  महालक्ष्मी भक्त मंडळाला सर्वतोपरी मदत करू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:42 PM2018-09-14T14:42:49+5:302018-09-14T14:46:13+5:30

विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री महालक्ष्मी भक्त मंडळाला सर्र्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

Kolhapur: Let the Mahalaxmi devotees help the devotees all the time: Chandrakant Patil | कोल्हापूर :  महालक्ष्मी भक्त मंडळाला सर्वतोपरी मदत करू : चंद्रकांत पाटील

कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील खजिन्यावरील गणपतीची आरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी अंजली आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी एस. के. कुलकर्णी, महेश जाधव, राजू मेवेकरी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देमहालक्ष्मी भक्त मंडळाला सर्वतोपरी मदत करू : चंद्रकांत पाटीलअंबाबाई मंंदिरातील खजिन्यावरील गणपतीची आरती

कोल्हापूर : विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री महालक्ष्मी भक्त मंडळाला सर्र्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील खजिन्यावरील गणपतीचा उत्सव गेल्या १२७ वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. या उत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, धर्मशाळेतर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सहकार्याने विविध उपक्रम होणार आहेत.

कोल्हापुरात  करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील खजिन्यावरील गणपतीची आरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील, त्यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते करण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)

गरुड मंडपातील खजिन्यावरील गणपतीची आरती पालकमंत्री पाटील व त्यांच्या पत्नी अंजली आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते गुरुवारी रात्री आठ वाजता करण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मंडळाचे नंदकुमार मराठे, एस. के. कुलकर्णी, संजय बावडेकर, संजय जोशी, प्रमोद भिडे, किरण धर्माधिकारी, राजन झुरळे, तन्मय मेवेकरी, विद्यासागर बावडेकर, आदींसह भाविक उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Let the Mahalaxmi devotees help the devotees all the time: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.