कोल्हापूर : बालचमूंच्या प्रतिसादात समर कॅम्पला सुरुवात,  ‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:28 PM2018-04-23T19:28:34+5:302018-04-23T19:28:34+5:30

उन्हाळी सुटीत बालचमूंच्या ऊर्जेला कलाकौशल्यांची आणि नवे काही शिकण्याची ऊर्मी देत सोमवारी ‘लोकमत बाल विकास मंच’च्यावतीने आयोजित समर कॅम्पला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे होत असलेल्या या समर कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी हस्ताक्षर कार्यशाळा घेण्यात आली.

Kolhapur: Initiative to start Summer camp in response to Child Rights, 'Lokmat Child Development Forum' | कोल्हापूर : बालचमूंच्या प्रतिसादात समर कॅम्पला सुरुवात,  ‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन

कोल्हापुरातील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे ‘लोकमत बाल विकास मंच’च्यावतीने आयोजित समर कॅम्पला सोमवारपासून सुरुवात झाली.

googlenewsNext
ठळक मुद्दे बालचमूंच्या प्रतिसादात समर कॅम्पला सुरुवात ‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत बालचमूंच्या ऊर्जेला कलाकौशल्यांची आणि नवे काही शिकण्याची ऊर्मी देत सोमवारी ‘लोकमत बाल विकास मंच’च्यावतीने आयोजित समर कॅम्पला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे होत असलेल्या या समर कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी हस्ताक्षर कार्यशाळा घेण्यात आली.

परीक्षा संपली की, मुलांना वेध लागतात ते काही तरी नवीन शिकण्याचे, धम्माल करण्याचे. मुलांच्या या ऊर्जेला विधायक उपक्रमाची जोड देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘लोकमत बाल विकास मंच’च्यावतीने ‘समर कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे.

सहा दिवस रंगणाऱ्या या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांची धम्माल, वॉटर गेम्सची मज्जा, नूडल्स-भेळसह खाद्यपदार्थांचा आस्वाद, समर कोल्ड्रिंक्स बनविण्याची संधी, अशा मनोरंजन, मस्तीसोबतच नवे काही शिकण्याची संधी मिळाल्याने बालचमूंची स्वारी अगदी आनंदात दिसली. यात पारंपरिक खेळ शिकविण्यात येणार आहेत, तसेच मुलांना सर्वांत जास्त कुतूहल असलेली जादू ‘मॅजिक वर्कशॉप’मध्ये शिकण्याची संधी मिळणार आहे.

आपले हस्ताक्षर अधिक सुंदर व वळणदार होण्यासाठी हँडरायटिंग वर्कशॉप होणार असून, मुलांना एक हँडरायटिंग बुकदेखील देण्यात आले आहे. इंधनाचा वापर न करता मुलांना घरच्या घरी बनविता येतील असे पदार्थ, तसेच विविध प्रकारचे उन्हाळी सरबत फूड मेकिंग वर्कशॉपमध्ये शिकविले जातील. सोबतच ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कमध्ये खूप सारी धम्माल असे या ‘समर कॅम्प’चे स्वरूप असेल.

समर कॅम्पचे नियोजन असे

दि. २३ व २४ : हस्ताक्षर कार्यशाळा
२५ : पारंपरिक खेळ
२६ : उन्हाळी सरबत (क ोल्ड्रिंक्स) कार्यशाळा
२७ : जादूचे प्रयोग कार्यशाळा
२८ : वॉटर गेम्स व खाद्यपदार्थांची मेजवानी

 

 

Web Title: Kolhapur: Initiative to start Summer camp in response to Child Rights, 'Lokmat Child Development Forum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.