कोल्हापूर : हॉटेल पंचशील आता उद्यापासून ’रॅमी पंचशील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:40 AM2018-11-11T00:40:52+5:302018-11-11T00:44:09+5:30

गेल्या २७ वर्षांपासून प्रशस्त, आरामदायी राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवाजी पार्कातील ‘हॉटेल पंचशील’ आता नव्या प्रगत ‘रॅमी पंचशील’ अशा नव्या ओळखीबरोबरच जगभरातील खवय्यांचे खास आकर्षण ठरलेल्या ‘टनाटन’ रेस्टॉरंटसह

Kolhapur: Hotel Panchsheel will now start with 'Ramee Panchsheel' | कोल्हापूर : हॉटेल पंचशील आता उद्यापासून ’रॅमी पंचशील’

कोल्हापूर : हॉटेल पंचशील आता उद्यापासून ’रॅमी पंचशील’

googlenewsNext
ठळक मुद्देप्रथमच किचन बार, लाईव्ह बँड म्युझिक- रॅमी हा बहुराष्ट्रीय शृंंखला गु्रप असून, ४२ रिसोर्टस्च्या माध्यमातून दुबई, बहारीन, ओमान, आदी अरब राष्ट्रांसह एकूण १५ देशांत सेवा देत आहे. ही माहिती रॅमी गु्रपचे संचालक निहित श्रीवास्तव व चोरडिया गु्रपचे चेअरमन व कार्यकारी संचालक कांतीलाल चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : गेल्या २७ वर्षांपासून प्रशस्त, आरामदायी राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवाजी पार्कातील ‘हॉटेल पंचशील’ आता नव्या प्रगत ‘रॅमी पंचशील’ अशा नव्या ओळखीबरोबरच जगभरातील खवय्यांचे खास आकर्षण ठरलेल्या ‘टनाटन’ रेस्टॉरंटसह उद्या, सोमवारपासून खास कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. ही माहिती रॅमी गु्रपचे संचालक निहित श्रीवास्तव व चोरडिया गु्रपचे चेअरमन व कार्यकारी संचालक कांतीलाल चोरडिया यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दर्जेदार सेवा व बढीया खाना देणारे हॉटेल अशी ख्याती ‘हॉटेल पंचशील’ने मिळवली व टिकवली आहे. आता हीच परंपरा जगविख्यात रॅमी ग्रुपसोबतही अधिक विस्तारित होत आहे. त्यानुसार रॅमी गु्रपसोबत सामंजस्य करार झाला आहे. यात शाकाहारी व मांसाहारी अशा अनेक आकर्षक डिशेस घेऊन या अंतर्गत ‘टनाटन’ नावाचे रेस्टॉरंट सेवेत दाखल होत आहे.

रॅमी हा बहुराष्ट्रीय शृंंखला गु्रप असून, ४२ रिसोर्टस्च्या माध्यमातून दुबई, बहारीन, ओमान, आदी अरब राष्ट्रांसह एकूण १५ देशांत सेवा देत आहे. भारतात मुंबई, जयपूर, पुणे, बंगलोर, आदी मोठ्या शहरांत रॅमीची हॉटेल्स आहेत. उत्तम हॉटेल रूम्ससोबत ‘टनाटन’सारखी थीम बेस्ड रेस्टॉरंट््स, फ्युजन फुड व लाईव्ह म्युझिक बँड, किचन व बार अशा स्पेशालिटीज खास कोल्हापूरकरांसाठी गु्रपने देऊ केल्या आहेत. त्यामुळे ‘टनाटन’मध्ये मांसाहारी डिशेससुद्धा रुचकर मिळणार आहेत. शाकाहारींसाठी ‘बगीचा’ रेस्टॉरंटमध्ये स्वतंत्र किचनद्वारे शाकाहारी डिशेसही आहेत. ही सेवा दुपारी १२ ते ३ व सायंकाळी ७ ते रात्री ११ वा. पर्यंत उपलब्ध असणार आहे.

२२२रॅमी पंचशील व टनाटन रेस्टॉरंटचे उद्घाटन उद्या, सोमवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार असून, ग्राहकांसाठी ते मंगळवार (दि. १३) पासून सेवेत दाखल होत आहे. यावेळी रॅमी गु्रपचे सरव्यवस्थापक विपीन हुद्दार, राहुल चोरडिया, विशाल चोरडिया, रौनक चोरडिया, सुधर्म वाझे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur: Hotel Panchsheel will now start with 'Ramee Panchsheel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.