कोल्हापूर : हज यात्रेकरूंना प्रवास, दक्षता अन् सुरक्षेबद्दल मार्गदर्शन : राजमहंमद तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 05:44 PM2018-05-12T17:44:19+5:302018-05-12T17:44:19+5:30

हज यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांना विमानातील प्रवास, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबतचे मार्गदर्शन शनिवारी केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी(जालना) यांनी येथे केले.

Kolhapur: Guidance on Travel, Vigilance and Safety to Haj Pilgrims: Rajmahmand Tamboli | कोल्हापूर : हज यात्रेकरूंना प्रवास, दक्षता अन् सुरक्षेबद्दल मार्गदर्शन : राजमहंमद तांबोळी

कोेल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येथे शनिवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरामध्ये केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी (जालना)यांनी कोल्हापुरातून हज यात्रेसाठी जाणाºया भाविकांना मार्गदर्शन केले.

googlenewsNext
ठळक मुद्दे हज यात्रेकरूंना प्रवास, दक्षता अन् सुरक्षेबद्दल मार्गदर्शन : राजमहंमद तांबोळी  मुस्लिम बोर्डिंग येथे प्रशिक्षण शिबिर

कोल्हापूर : हज यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांना विमानातील प्रवास, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबतचे मार्गदर्शन शनिवारी केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी (जालना)यांनी येथे केले. मुस्लिम बोर्डिंग येथे कोल्हापुरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तांबोळी यांनी भाविकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्लाईड शोच्या माध्यमातून यात्रेदरम्यान करावयाच्या विधीची माहिती दाखविली. आंतरराष्ट्रीय  प्रवास करण्यापूर्वी घ्यायचे इंजेक्शन, विमान प्रवासा दरम्यान आसन व्यवस्थेसह आपल्या साहित्याची सुरक्षा कशी करावी तसेच आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.

सौदी सरकारची यात्रेसाठी कडक नियमावली आहे. त्याचे पालन कसे करावे, य त्रेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास कुठे संपर्क साधावा आणि यात्रा कालावधीत करावयाचे विधी याबाबत तांबोळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

हाजी दिलावर मुल्लाणी यांनी हज यात्रेकरूंच्या शंकांचे निरसन केले. या शिबिरात ५०० हून अधिक हज यात्रेकरू सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा हज कमिटीचे अध्यक्ष हाजी इक्बाल देसाई, नजीर मिस्त्री, बाबासाहेब शेख, हाजी जहॉँगीर अत्तार, सादिक जमादार आदींसह कमिटीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Guidance on Travel, Vigilance and Safety to Haj Pilgrims: Rajmahmand Tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.