कोल्हापूर : गवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढला, तांदळाच्या दरात किचिंत वाढ, द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:22 PM2018-01-22T12:22:25+5:302018-01-22T12:31:36+5:30

नेहमी जेवणात वापरणारा कांद्याचा दर या आठवड्यात प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढला आहे. तो २८ रुपयांच्या घरात गेला आहे. दुसरीकडे, गवार आणि वांगी, काद्यांची पात आवक जास्त आल्याने दरात घसरण झाली आहे; पण, इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. भाज्याबरोबर कडधान्यालाही ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

Kolhapur: Guar, Vangi, cheap; Onion grew, demand for rice increased, grapes, pineapple, Malta demand | कोल्हापूर : गवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढला, तांदळाच्या दरात किचिंत वाढ, द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

कोल्हापूर : गवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढला, तांदळाच्या दरात किचिंत वाढ, द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

Next
ठळक मुद्देगवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढलातांदळाच्या दरात किचिंत वाढ द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

कोल्हापूर : नेहमी जेवणात वापरणारा कांद्याचा दर या आठवड्यात प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढला आहे. तो २८ रुपयांच्या घरात गेला आहे. दुसरीकडे, गवार आणि वांगी, काद्यांची पात आवक जास्त आल्याने दरात घसरण झाली आहे; पण, इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. भाज्याबरोबर कडधान्यालाही ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

रविवारचा आठवडी बाजार लक्ष्मीपुरी तर कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेस उद्यानजवळ दैनंदिन बाजार भरतो. गेल्या आठवड्यातील मकर संक्रांत सणामुळे या आठवड्यात ग्राहकांची रेलचेल बाजारात कमी दिसून येत होती; पण; माल्टा, अननस, द्राक्षे (पिवळी व काळी) यांना ग्राहकांकडून मागणी जास्त होती.

माल्टाचा दर प्रतिकिलो ५० रुपये, राणी अननस ४० रुपये तर राजा अननस ३० रुपये असा होता. द्राक्षांचा दर ८० ते शंभर रुपयांच्या घरात होता. कोबी, टोमॅटो (लाल), ढब्बू मिरची, घेवडा, कारली, भेंडी, वरणा, फ्लॉवर, दोडक्याचे दर स्थिर होते. मात्र, गवार व वांग्याची आवक जास्त आल्याने घसरण झाली होती.

गेल्या आठवड्यात गवारचा प्रतिकिलो दर ४० रुपयांवरून तो २६ रुपयांच्या घरात आला आहे. वांगी २० रुपयांवरून ती १५ रुपये होती. कांद्यांची पात दोन रुपयांनी कमी झाली. पेंढीचा दर पाच रुपये असा होता. मेथीच्या पेंढीत एक रुपयांनी वाढ होऊन ती पाच रुपये झाली.

काकडी , वाल, बिनीस, दुधी भोपळा, गाजर, आल्हेचा, पालक, पोकळा, बटाटा, लसणाचा व सफरचंद, स्ट्रॉबेरी आणि ड्रायफ्रुट दर स्थिर होता. बटाटा नऊ रुपये तर लसूण २५ रुपये प्रतिकिलो दर होता. त्याचबरोबर सर्वप्रकारच्या तांदूळ दरात चार ते पाच रुपये वाढ झाली आहे. ४० रुपये प्रतिकिलोचा दर तो ४४ रुपये झाला आहे.

फळ मार्केटवर नजर...

  1.  डाळींब - एक किलो ४० रुपये
  2.  सीताफळ - ढीग ७५ रुपये
  3. बोरे -११ रुपये किलो
  4.  चिक्कू -शेकडा ३७५ रुपये
     

असा आहे दर...

  1. शेंगतेल १००
  2. मूग, मसूर, शेंगदाणा ८०
  3. सरकी तेल ७६ ते ७८ रुपये
  4. शाबू, तूरडाळ ७५ 
  5. हिरवा वटाणा ४० ते ६० रुपये
  6.  गूळ ४० रुपये

 

Web Title: Kolhapur: Guar, Vangi, cheap; Onion grew, demand for rice increased, grapes, pineapple, Malta demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.