कोल्हापूर - वर्षभरात चारशे कोटी रुपयांची फसवणूक, तब्बल २१ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:16 AM2019-01-24T01:16:49+5:302019-01-24T01:17:24+5:30

दामदुप्पट पैसे, नोकरी, शेअर मार्केटिंग, आदींसह आॅनलाईन आर्थिक फसवणुकीचे वर्षभरात जिल्ह्णातून २१ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल आहेत. झटपट श्रीमंत आणि पैशांच्या हव्यासापोटी सुमारे चारशे कोटींचा फटका सर्वसामान्य

 Kolhapur - fraud worth 400 crores rupees, 21 cases filed in the year | कोल्हापूर - वर्षभरात चारशे कोटी रुपयांची फसवणूक, तब्बल २१ गुन्हे दाखल

कोल्हापूर - वर्षभरात चारशे कोटी रुपयांची फसवणूक, तब्बल २१ गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देझटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गुन्ह्यांमध्ये वाढ; तपासासाठी स्वतंत्र गुन्हे शाखा

एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : दामदुप्पट पैसे, नोकरी, शेअर मार्केटिंग, आदींसह आॅनलाईन आर्थिक फसवणुकीचे वर्षभरात जिल्ह्णातून २१ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल आहेत. झटपट श्रीमंत आणि पैशांच्या हव्यासापोटी सुमारे चारशे कोटींचा फटका सर्वसामान्य लोकांना भामट्यांनी घातला आहे. आकडेवारी पाहिली असता फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी जिल्ह्णात अनेक सुशिक्षित लोक आमिषाला बळी पडत आहेत. लोकांनी कर्ज काढून एजन्सींच्या बँक खात्यांवर लाखो रुपये भरले. या फसवणुकीमध्ये भरकटलेल्या अनेक व्यक्तींचे संसार उघड्यावर पडले आहेत. यात काही लोकप्रतिनिधी, प्रसिद्ध उद्योगपती, व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांसह सहकारी संस्थांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी लोकांना दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून सुमारे ४०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अपहाराची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्णांचा अभ्यासपूर्ण तपास केला जात आहे. अनेक गुन्ह्णांमध्ये आरोपींना अटक झाली आहे. काहींनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व गुन्ह्णांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखा विभाग आहे.

वर्षभरातील आर्थिक फसवणुकीचे गुन्हे
१) सत्यनारायण प्रभुदयाल खंडेलवाल (रा. इचलकरंजी) याने ८६ कोटी १८ लाखांची फसवणूक केली आहे.
२) व्ही. एच. अपराध याने कंपन्यांना शेअर्स होल्डरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधी फसवणूक केली.
३) अमित कृष्णात पाटील (रा. आरे, ता. करवीर) याने शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करून दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
४) पी. ए. सी. एल. कंपनीने गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे.
५) संभाजी कृष्णा बागणे
(रा. उजळाईवाडी) याने बांधकाम करून देण्याचे आश्वासन देऊन ग्राहकांची फसवणूक केली.
६) मॅकजॉय लॅबोरेटरी कंपनीत शेअर्सचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केली.
७) सीआरबी केपीएल मार्केट दिल्ली या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक.
८) सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे उत्पादित ऊर्जा विकून फेडरेशनचा नफा करून देण्याचे आमिषाने जनतेची फसवणूक.
९) मेकर ग्रुप इंडिया कंपनीच्या ठेवींत गुंतवणूकदारांची ५६ कोटी ४४ लाखांची फसवणूक.
१०) एस. के. पाटील को-आॅप. बँक लि., कुरुंदवाड येथे अपहार; अध्यक्षांसह २३ संचालकांवर गुन्हा. सुमारे १७ कोटी ३१ लाखाची फसवणूक.
११) वैद्यकीय उपचाराच्या योजनेच्या नावाखाली सिंग ग्रुपच्या वतीने फसवणूक.
१२) तारदाळ (ता. हातकणंगले) येथील संस्थेतील साडेसात कोटींचा अपहार.
१३) कॅन्सर रुग्णालयातील औषधांमध्ये दीड कोटींचा गैरव्यवहार.
१४) सोन्याच्या दुकानात भागीदारीचे आमिष दाखवून २ कोटी ४० लाखांची फसवणूक.
१५) रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था तिळवणी (ता. हातकणंगले) येथे अडीच कोटींची फसवणूक.
१६) झिपक्वाईन क्रिप्टो करन्सीद्वारे सात महिन्यांत भामट्यांनी दीडशे कोटी रुपयांचा अपहार केला.
१७) पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. के. ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांनी कोल्हापूरच्या लोकांना २५ कोटींचा गंडा घातला.
१८) इचलकरंजी येथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज काढण्यासाठी १०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील मिलेनियर ग्रुपमधील आठ संशयितांनी व्यापाऱ्याला एक कोटी चार लाख रुपयांना गंडा घातला आहे.
१९) कमी पैशांत घरे बांधून देण्याचे आमिषाने कर्नाटकातील व्यावसायिकाने इचलकरंजीतील ३० लोकांना सुमारे दोन कोटींचा गंडा घातला.
२०) खोटे सातबारा व आठ अ उतारे सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आय. डी. बी. आय. बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा.
२१) प्राईम अ‍ॅग्रो फसवणूक प्रकरण.
 

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कागदोपत्री पुरावे गोळा करून संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणली जाते. स्थावर मालमत्तेसंबंधी न्यायालय व शासन स्तरांवर मंजुरी घेऊन लिलाव करून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो.
- आर. बी. शेडे : पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

Web Title:  Kolhapur - fraud worth 400 crores rupees, 21 cases filed in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.