कोल्हापूर : शहरासह उपनगरांत ‘चेन स्नॅचर’चा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:55 PM2018-09-05T13:55:33+5:302018-09-05T13:57:52+5:30

कोल्हापूर शहरासह उपनगरात ‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवार (दि. ४) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आर. के. नगर, प्रतिभानगर रोडवर तिन्ह महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

Kolhapur: The fog of 'chain snort' in the suburbs with the city | कोल्हापूर : शहरासह उपनगरांत ‘चेन स्नॅचर’चा धुमाकूळ

कोल्हापूर : शहरासह उपनगरांत ‘चेन स्नॅचर’चा धुमाकूळ

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर शहरासह उपनगरांत ‘चेन स्नॅचर’चा धुमाकूळतासाभरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंग : पोलिसांना आव्हान

कोल्हापूर : शहरासह उपनगरात ‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवार (दि. ४) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आर. के. नगर, प्रतिभानगर रोडवर तिन्ह महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

स्वामी समर्थ मंदिर ते पी. डी. भोसले नगर जाणारे रोडवर मंगळवारी सायंकाळी ग्रंथवाचनाचे कार्यक्रम झालेनंतर घरी जात असताना रेश्मा विनायक घाटगे (वय ३१, रा. आर. के. नगर) यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण पाठिमागून दूचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले.

त्यापूर्वी प्रतिभानगर येथे भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना स्रेहल श्रीकांत धुमे (रा. सम्राटनगर) यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण चोरुन नेले. पुढे काही अंतरावर चेन स्नॅचरनी विद्या माधव पाटील (७०, रा. सम्राटनगर) यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण हिसडा मारून लंपास केले.

तासाभरात तीन चेन स्नॅचिंग झालेने नागरिकांत भिती पसरली आहे. चेन स्नॅचरनी शहरासत उपनगरात धूमाकुळ घातला आहे. पोलीसांनी त्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
 

 

Web Title: Kolhapur: The fog of 'chain snort' in the suburbs with the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.