कोल्हापूर : पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 05:10 PM2019-01-09T17:10:48+5:302019-01-09T17:13:59+5:30

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Kolhapur: On the first day, the Tembaliwadi Market Samasoom | कोल्हापूर : पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम

कोल्हापूर : पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम

Next
ठळक मुद्दे पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम उद्घाटन झाले; पण विक्री लक्ष्मीपुरीतच: एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला उपबाजाराचा प्रश्न बाजार समिती व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नाने मार्गी लागला. समिती प्रशासन व व्यापारी यांच्यातील विसंवादातून मंगळवारी उपबाजाराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. व्यापाºयांनी समिती प्रशासनाला अंगावर घेत मंगळवारी मोठ्या थाटात उद्घाटनही केले.

उद्घाटनानंतर किमान वीस व्यापाºयांचा व्यवहार तिथेच सुरू होईल, अशी अपेक्षा होती; पण बुधवारी उपबाजार परिसर सामसूम दिसत होता. कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाणघेवाण अथवा विक्री दिसत नव्हती. बुधवारी दिवसभर नेहमीप्रमाणे लक्ष्मीपुरी व शाहूपुरीतच विक्री सुरू राहिली. एक-दोन दुकानांत मालाची ने-आण सुरू राहिली होती.

आता नेत्यांच्या हस्ते उद्घाटन

नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम दोन-तीन दिवस पुढे ढकलण्याबाबत समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना विनंती केली होती; पण व्यापाऱ्यांचा मुहूर्तावरच तिथे जाण्याचा आग्रह राहिला. आता समिती प्रशासनाच्या वतीने येत्या आठ दिवसांत नेतेमंडळींच्या हस्ते उपबाजाराचे उद्घाटन केले जाणार आहे.

 

 

 

Web Title: Kolhapur: On the first day, the Tembaliwadi Market Samasoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.