कोल्हापूर : अंतिम लढतीचे दावेदार आज ठरणार, सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:41 AM2018-05-19T11:41:28+5:302018-05-19T11:41:28+5:30

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पावसामुळे स्थगित झालेल्या दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उर्वरित सामना आज, शनिवारी दुपारी दोन वाजता, तर साखळी फेरीतील बालगोपाल तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यामधील अखेरचा सामना दुपारी चार वाजता होणार आहे.

Kolhapur: Finalists will be the final, seven -teenth soccer competition; Patan - Dillabhar Matthi all eyes attention | कोल्हापूर : अंतिम लढतीचे दावेदार आज ठरणार, सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : अंतिम लढतीचे दावेदार आज ठरणार, सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

Next
ठळक मुद्देअंतिम लढतीचे दावेदार आज ठरणारसतेज चषक फुटबॉल स्पर्धा पाटाकडील- दिलबहार लढतीकडे सर्वांचे लक्ष

कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पावसामुळे स्थगित झालेल्या दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उर्वरित सामना आज, शनिवारी दुपारी दोन वाजता, तर साखळी फेरीतील बालगोपाल तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यामधील अखेरचा सामना दुपारी चार वाजता होणार आहे. या लढतीतील विजयी संघ अंतिम फेरीत दाखल होणार असल्याने सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष या सामन्यांकडे लागून राहिले आहे.

शाहू स्टेडियमवर दि. ६ ते २० मेदरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने दोन साखळी फेरीतील सामन्यांमधून सहा गुणांची कमाई करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे तर दिलबहार तालीम मंडळ (अ) चे दोन सामन्यात चार गुण आहेत.

या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर हा सामना बरोबरीत अथवा जिंकणे क्रमप्राप्त आहे तर बालगोपाल संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे चार गुण होणार आहेत. प्रॅक्टिस संघाचे शून्य गुण आहेत. दिलबहार संघ हरला तर त्यांचेही चार गुण होणार आहेत. यात दोन्ही संघांतील गोलफरक लक्षात घेऊन अंतिम फेरीतील संघ ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यांकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Finalists will be the final, seven -teenth soccer competition; Patan - Dillabhar Matthi all eyes attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.