कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:43 AM2018-05-23T10:43:17+5:302018-05-23T10:43:17+5:30

देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

Kolhapur: Electricity connection to 22 households in Kolhapur district under good luck scheme | कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

googlenewsNext
ठळक मुद्देसौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणीमहाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

कोल्हापूर : देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात या योजनेंतर्गत सर्वात जास्त ४५५ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे, या जिल्हयात एकूण ७ खेडयात वीज जोडणी देण्यात आली. तसेच सातारा जिल्हयातील एका खेडयात ६५  या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेडयांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेडयांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. 

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या गोर-गरीब जनतेला वीज जोडणी देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजना सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेडयाला मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले असून गेल्या ७ महिन्यांपासून आजपर्यंत देशभरातील २७ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेडयांना वीज जोडणी देण्यात आली आहे, ज्याद्वारे ५ लाख १९ हजार ३५८ घरांना जोडणीचा लाभा मिळाला आहे.

विदर्भातील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी

सौभाग्य योजना सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण २३ जिल्हयांतील १९२ खेडयांना या योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्हयांतील १४० खेडयांतील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मराठवाडयातील ८ जिल्हयातील ४२ खेडयांतील २ हजार९३८ घरांना, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ९ खेडयांतील ५४२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि खान्देशातील १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

सौभाग्य योजनेंतर्गत विदर्भात सर्वात जास्त गडचिरोली

जिल्हयात वीज जोडणी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हयातील ८ खेडयांतील ११५९ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यासोबत अकोला जिल्हयातील ३४ खेडयांमधील ४१० घरांना, अमरावती जिल्हयातील २५ खेडयांमधील ७३५ घरांना, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील २४४ घरांना, बुलडाणा जिल्हयातील २२ खेडयांतील ५६५ घरांना,चंद्रपूर जिल्हयातील ७ खेडयांतील ७४४ घरांना, नागपूर जिल्हयातील ४ खेडयांतील १०२ घरांना, गोदिंया जिल्हयातील ३ खेडयांतील ५९ घरांना, वाशिम जिल्हयातील १५ खेडयांतील ४२६ घरांना, यवतमाळ जिल्हयातील १३ खेडयांतील ७८८ घरांना, वर्धा जिल्हयातील २ खेडयांतील ५ घरांना सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यातआली आहे.

मराठवाडयातील २ हजार ९३८ घरांना वीज जोडणी

या योजनेंतर्गत मराठवाडा विभागात नांदेड जिल्हयात सर्वात जास्त १२१७ घरात वीज जोडणी देण्यात आली या जिल्हयातील २० खेडयांमध्ये ही जोडणी देण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील ३ खेडयांमधील ४०४ घरांना, औरंगाबाद जिल्हयातील एका खेडयातील ७२ घरांना, बीड जिल्हयातील ३ खेडयांतील १५७ घरांना, हिंगोली जिल्हयातील ५ खेडयांतील ४८० घरांना, लातूर जिल्हयातील ७ खेडयांतील ३४९ घरांना, उस्मानाबाद जिल्हयातील २ खेडयांतील ७८ घरांना आणि जालना जिल्हयातील एका खेडयातील १८१ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
खान्देशातील जळगाव जिल्हयातील एका खेडयामध्ये या योजनेंतर्गत १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

Web Title: Kolhapur: Electricity connection to 22 households in Kolhapur district under good luck scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.