महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ जाहीर, ६४ जणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:41 PM2017-12-05T13:41:12+5:302017-12-05T13:47:10+5:30

महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी महेश वरुटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे साठावे कुस्ती अधिवेशन ‘महाराष्ट्र केसरी’ भूगाव (जिल्हा पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा तालीम संघातर्फे मंगळवारी जिल्हा संघ जाहीर झाला.

Kolhapur district team announced for Maharashtra Kesari tournament, 64 people selected | महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ जाहीर, ६४ जणांची निवड

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ जाहीर, ६४ जणांची निवड

googlenewsNext
ठळक मुद्दे खुल्या गटातून महेश वरुटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची निवडमहाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी

कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी महेश वरुटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे साठावे कुस्ती अधिवेशन ‘महाराष्ट्र केसरी’ भूगाव (जिल्हा पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा तालीम संघातर्फे मंगळवारी जिल्हा संघ जाहीर झाला.


राजर्षी शाहू खासबाग येथे झालेल्या कुस्ती निवड चाचणीत दोन्ही प्रकारात एकूण ६४ जणांची निवड करण्यात आली. यात फ्रिस्टाईलमध्ये ५५ किलो- अभिजीत संभाजी पाटील (बानगे), विठ्ठल आनंदा कांबळे (कोगे), ६० किलो- सद्दाम कासिम शेख (दºयाचे वडगाव), रविंद्र संजय लाहार (मौ.सांगाव), ६३ किलो- विक्रम कृष्णात कुराडे (नंदगाव), विशाल बाजीराव कोंडेकर (मुरगुड), ६७ किलो- प्रितम शामराव खोत (आणूर), शुभम बाजीरवार कोंडेकर (मुरगुड), ७२ किलो- सागर आनंदा पाटील (खुपीरे), सागर प्रभाकर राजगोळकर (कोवाड), ७७ किलो- सुभाष गणपती पाटील (साके), वैभव प्रकाश तेली (बानगे), ८२ किलो- शिवाजी शामराव पाटील (बानगे), सतीश आनंदा आडसुळ (निढोरी),

८७ किलो- वैभव बाबासाो पाटील (पाडळी खुर्द), ऋषिकेश सदाशिव पाटील (कांदवडे), ८६ किलो- ऋषिकेश राजेंद्र पाटील (राशिवडे बुद्रुक), अतुल आनंदा डावरे (बानगे), सरदार अर्जुन सावंत (आमशी), बाबासाहेब आनंदा राजगे (आरे), ९० किलो- ऋतुराज तानाजी राऊत (कुडीत्रे), अतुल अनिल माने (वडणगे), ९२ किलो- रोहन रंगराव रडे (निढोरी), धनाजी मारुती पाटील (देवठाणे), श्रीमंत जालंदर भोसले(मिणचे), अभिजीत आनंदा भोसले (शितूर),

९७ किलो- विजय सदाशिव पाटील (पाडळी खुर्द), अजित रामचंद्र पाटील (सावे), ओंकार दिलीप भातमारे (इंगळी), अरुण विजय बोंगार्डे (बानगे), महाराष्ट्र केसरी गटासाठी महेश कृष्णा वरुटे (रणदिवेवाडी, मोतीबाग तालीम), कौतुक शामराव डाफळे (मुळचा पिंपळगाव, काका पवार कुस्ती प्रशिक्षण केंद्र, पुणे)उदयराज दत्तात्रय पाटील (अर्जुनवाडा, मोतीबाग तालीम), सचिन शामराव जामदार ( कोपार्डे, गंगावेश तालीम ) यांचा समावेश आहे.


ग्रिको रोमनमध्येही यातील बहुतांशी मल्लांची निवड झाली. याव्यतिरिक्त८७ किलोमध्ये वैभव बाबासो पाटील (पाडळी खुर्द), ऋषिकेश सदाशिव पाटील (कांदवडे), ९७ किलो- ऋतुराज तानाजी राऊत (कुडीत्रे), अतुल अनिल माने (वडणगे), १३० किलोमध्ये कुमार कुंडलीक पाटील (शित्तुर), अब्दुल आयुब पटेल (औरवाड) यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ५,५५५ चे बक्षिस जाहीर

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेल्या महेश वरुटे, कौतुक शामराव डाफळे , उदयराज दत्तात्रय पाटील ,सचिन शामराव जामदार यांच्यापैकी कोणीही कोल्हापूरला गदा आणली तर त्यांना कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष प्रकाश खोत यांच्यातर्फे ५ हजार ५५५ रुपये रोख दिले जाणार आहेत. अशी घोषणा त्यांनी स्वत: मैदानात केली.
 

 

Web Title: Kolhapur district team announced for Maharashtra Kesari tournament, 64 people selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.