कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये विजय आचरेकर यांची चित्र कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:31 PM2018-01-23T16:31:40+5:302018-01-23T16:38:44+5:30

कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांची व्यक्तिचित्र व रचनाचित्र ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आचरेकर यांनी रेखाकन, तंत्र, आकारांची अवकाशातील मांडणी, छायाप्रकाश व रंगलेपनाचे संदर्भ याला अनुसरून कलाकृतीची निर्मिती व सहजता यावर मार्गदर्शन केले.

Kolhapur: In the Dalvi's Art Institute, the workshop of Vijay Achrekar was thrilled | कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये विजय आचरेकर यांची चित्र कार्यशाळा उत्साहात

चित्रकार विजय आचरेकर यांनी कार्यशाळेत रेखाटलेली चित्रे.

googlenewsNext
ठळक मुद्देदळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये व्यक्तिचित्र व रचनाचित्र कार्यशाळा मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांची व्यक्तिचित्र व रचनाचित्र ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.


पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आचरेकर यांनी रेखाकन, तंत्र, आकारांची अवकाशातील मांडणी, छायाप्रकाश व रंगलेपनाचे संदर्भ याला अनुसरून कलाकृतीची निर्मिती व सहजता यावर मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिकात आधुनिक साधनांचा व तंत्राचा योग्य वापर कसा करावा हे सुचविताना तैलरंग, अ‍ॅक्रॅलिक व जलरंग या माध्यमातील दृष्य अनुभव विद्यार्थ्यांना दिला.
 

 

Web Title: Kolhapur: In the Dalvi's Art Institute, the workshop of Vijay Achrekar was thrilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.