कोल्हापूर :  स्वच्छता अभियानामध्ये श्रृंगारवाडी पुणे विभागात तिसरी, सहा लाख रुपयांचे बक्षिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:06 AM2018-10-24T11:06:58+5:302018-10-24T11:08:09+5:30

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ही ग्रामपंचायत सहा लाख रुपयांची मानकरी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Kolhapur: In the cleanliness campaign, a third, a cash prize of Rs. Six lakh in Shringarwadi Pune division | कोल्हापूर :  स्वच्छता अभियानामध्ये श्रृंगारवाडी पुणे विभागात तिसरी, सहा लाख रुपयांचे बक्षिस

श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीचे कार्यालय

Next
ठळक मुद्देस्वच्छता अभियानामध्ये श्रृंगारवाडी पुणे विभागात तिसरीसहा लाख रुपयांचे बक्षिस

कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ही ग्रामपंचायत सहा लाख रुपयांची मानकरी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या या वर्षीच्या विभागस्तरीय समितीने दुसरा टप्पा पूर्ण केला आहे. या पडताळणीमध्ये विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या ग्राम पंचायतींची तपासणी करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून श्रृंगारवाडी, ता. आजरा व ग्राम पंचायत हेब्बाळ जलद्याळ, ता. गडहिंग्लज या दोन ग्राम पंचायतींची विभागस्तरावरून तपासणी करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये श्रृंगारवाडी ग्राम पंचायतीने तिसरा क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. या वर्षीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले असून, त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींनी तयारी करावी आणि स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

 

 

Web Title: Kolhapur: In the cleanliness campaign, a third, a cash prize of Rs. Six lakh in Shringarwadi Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.