कोल्हापूर : चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर, लहान मुलांच्या भांडणातून तरुणाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:29 PM2018-09-24T16:29:09+5:302018-09-24T16:31:02+5:30

मार्केट यार्ड येथे लहान मुलांच्या भांडणातून सुरु असलेली वादावादी सोडविण्यास गेलेच्या रागातून तरुणाने केलेल्या चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर जखमी झाला.

Kolhapur: In the Chaku attack, the son is serious, the act of youth is in the fight against children | कोल्हापूर : चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर, लहान मुलांच्या भांडणातून तरुणाचे कृत्य

कोल्हापूर : चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर, लहान मुलांच्या भांडणातून तरुणाचे कृत्य

ठळक मुद्देचाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीरलहान मुलांच्या भांडणातून तरुणाचे कृत्य

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथे लहान मुलांच्या भांडणातून सुरु असलेली वादावादी सोडविण्यास गेलेच्या रागातून तरुणाने केलेल्या चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर जखमी झाला.

सुरज शिवाजी अवघडे (वय ३५), त्याची आई संगीता (४५) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी संशयित मनोज दादू खोत (३२, रा. मार्केट यार्ड) याचेवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तो पसार असून पोलीस शोध घेत आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक माहिती अशी, सूरज अवघडे आणि संशयित मनोज खोत समोरासमोर राहतात. रविवारी (दि. २३) सकाळी येथील लहान मुलांची खेळण्यातून वादावादी झाली होती. त्याचे पर्यावसान रात्री मोठ्या लोकांच्यात झाले. खोत हा गल्लीतील लोकांना शिवीगाळ करीत होता.

यावेळी सूरज त्याला वाद करु नको असे सांगू लागला असताना त्याने चाकु काढून त्याच्या गळ्यावर वार केला. मुलावर हल्ला झालेचे पाहून आई पुढे आली असता त्यांचे हातावर चाकुने वार केला. रक्तबंबाळ अवस्थेत आईसह मुलगा जमिनीवर कोसळले. हल्ल्यानंतर संशयित खोत हा पसार झाला. येथील नागरिकांनी जखमी दोघांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
 

 

Web Title: Kolhapur: In the Chaku attack, the son is serious, the act of youth is in the fight against children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.