कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:12 PM2017-10-19T17:12:34+5:302017-10-19T17:25:14+5:30

एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले फलक कामगारांनी फाडला. तर प्रशासनाने संपकऱ्यांवर होणारया कायदेशीर कारवाईबाबात काढलेल्या परिपत्रकांची होळी विविध कामगार संघटनांनी केला.

In Kolhapur central bus stand, the transport minister rapped the board | कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला

एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसर्या दिवाशी विविध कामगार संघटनानी संपकऱ्यांना पाठिंबा देत.प्रशासनाने संपात सहभागी होणार्या एस.टी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काढलेले परिपत्रकांची कोल्हापूर विभागीय कार्यशाळा येथे गुरुवारी दुपारी होळी करण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देतिसऱ्या दिवशी एस.टीचा संप सुरुचविविध कामगार संघटनांनी परिपत्रकांची केली होळीसरकारच्या निषेध म्हणून शंखध्वनी जोरदार घोषणा देण्यात आल्याने वातावरण तंग

कोल्हापूर, दि. १९ :  एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले फलक कामगारांनी फाडला. तर प्रशासनाने संपकऱ्यांवर होणारया कायदेशीर कारवाईबाबात काढलेल्या परिपत्रकांची होळी विविध कामगार संघटनांनी केली.


सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपा तिसऱ्या  दिवशी सुरुच राहिला. मध्यवर्ती बसस्थानक येथे दुपारी बारा वाजता विविध कामगार संघटनेचे पदाधिकारयांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एस.टी कर्मचाऱ्याच्या संपाला जाहिर पाठिंबा दिला. यावेळी आघाडी सरकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, सरकारची दडपशाही कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून न घेण्याचा निर्धार सर्वांनी केला.


त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालया समोर प्रशासनाच्यावतीने संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काढण्यात आलेले परिपत्रकांची होळी करत सरकारच्या निषेध म्हणून शंखध्वनी करण्यात आला.


त्यानंतर काही कर्मचार्यांनी मध्यवर्ती बसस्थानकात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले फलक फाडत मंत्री रावते यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र प्रमुख पदाधिकारी यांनी कामगारांना शांत राहण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती अटोक्यात आली.

दिवसभर कर्मचारी मोठ्या संख्येने मध्यवर्ती बसस्थानक येथे बसून होते. संपकरी कर्मचाऱ्याना संघटनेचे पदाधिकारी मुंबईतील चर्चेबाबतची सविस्तर माहिती देत होते. संपाबाबात मुंबई यावेळी कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

यांनी दिला पाठिंबा....

मध्यवर्ती बसस्थानक येथे एस.टी. कर्मचारी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देवून प्रलंबीत प्रश्नाबाबत शासन दरबारी पाठपुरवा करण्याचे अश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय कम्युनिष्ट पक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, को. जि. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ, महानगर माध्यमिक शिक्षक संघटना यांनी पाठिंबा दिला.

रंकाळा स्थानकांत खासगी वाहने

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेस, स्कूल बस, व्हॅन, केएमटीला जादा टप्प्यांवर वाहतूक करण्याची सुविधा प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दिली आहे. त्यामुळे गुरुवारी खासगी वाहने थेट रंकाळा बसस्थानकांत लावून प्रवाशी घेतले जात होते.

 

 

Web Title: In Kolhapur central bus stand, the transport minister rapped the board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.