कोल्हापूर : फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर कारवाई, दहा हजार रुपये दंडाची वसुली, वाहतूक शाखेच्या पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:21 PM2018-01-08T17:21:32+5:302018-01-08T17:25:55+5:30

वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Kolhapur: Action on fancy numberplate vehicles, recovery of fine of Rs. 10,000, traffic branch police campaign | कोल्हापूर : फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर कारवाई, दहा हजार रुपये दंडाची वसुली, वाहतूक शाखेच्या पोलिसांची मोहीम

कोल्हापुरात वाहनांना नियमबाह्य व अनियमित फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक शाखेचे पोलिस.

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरात फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर कारवाईवाहतूक शाखेच्या पोलिसांची मोहीमदहा हजार रुपये दंडाची वसुली

कोल्हापूर : वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘सरपंच’, ‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘राम’, ‘पाटील’, ‘बॉस’,यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्तपणे वाहनचालक शहरात वावरत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे त्यांनी चार दिवसांपूर्वी सर्व नागरिक, वाहनचालकांनी वाहन चालविताना विहीत नमुन्यातील मापदंडाप्रमाणे वाहनांचे नंबरप्लेट बसवून आपले सोबत योग्य ती कागदपत्रे जवळ बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन केले होते.

सोमवारी शिवाजी पूल, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका परिसरात वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत वाहतूक नियमांचा भंग करणे, नियमबाह्य नंबरप्लेट वापरणे, वाहन नोंदणी न करताच वापरणे आदींवर कारवाई करण्यात आली.

 

Web Title: Kolhapur: Action on fancy numberplate vehicles, recovery of fine of Rs. 10,000, traffic branch police campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.