कोल्हापूर :  हिसाब बराबर होगा, गौरव वडेरची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, आव्हानाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:41 PM2018-05-23T12:41:31+5:302018-05-23T12:41:31+5:30

प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

Kolhapur: Accounts will be equal, Gaurav Vader's controversial post on Facebook, discussion of the challenge | कोल्हापूर :  हिसाब बराबर होगा, गौरव वडेरची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, आव्हानाची चर्चा

कोल्हापूर :  हिसाब बराबर होगा, गौरव वडेरची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, आव्हानाची चर्चा

ठळक मुद्देगौरव वडेरची फेसबुकवर वादग्रस्त पोस्टहिसाब बराबर होगा, आव्हानाची चर्चा

कोल्हापूर : प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

रविवारी रात्री पाचगाव येथील प्रतीक पोवार याचा रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी प्रमुख संशयित प्रतीक सरनाईक याला अटकही करण्यात आली आहे.

गौरव वडेर हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यानेच या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी गौरव वडेर याने प्रतीकला फेसबुकवरून श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, यामध्ये जी भाषा वापरली आहे ती आव्हानात्मक आहे.

वास्तविक, सरनाईक हा त्याच वेळी गौरव वडेर याचीही गेम करणार होता. मात्र, रिव्हॉल्व्हर लोड न झाल्याने तो बचावला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर गौरवने फेसबुकवरून अशा पद्धतीने इशारा दिल्याने हे प्रकरण तापण्याचीच चिन्हे आहेत.

ही आहे फेसबुकची पोस्ट..

हमें हराकर कोई हमारी जान भी ले जाए
तो हमें मंजूर है।
लेकिन धोखा देनेवालोें को
हम दोबारा मौका नहीं देते।
हिसाब बराबर होगा।

 

 

Web Title: Kolhapur: Accounts will be equal, Gaurav Vader's controversial post on Facebook, discussion of the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.