कोल्हापूर : आर्यन पाटील, सूरज पालकरसह ३३ जण पुढील फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 04:05 PM2018-12-12T16:05:02+5:302018-12-12T16:06:32+5:30

सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत प्रतिस्पर्धी मल्लाला नमवून आर्यन पाटील, सूरज पालकर, रोहित पाटील, प्रशांत मांगुरे यांच्यासह ३३ जणांनी मंगळवारी पुढील फेरीत प्रवेश केला.

Kolhapur: 33 people including Aryan Patil and Suraj Palkar in the next round | कोल्हापूर : आर्यन पाटील, सूरज पालकरसह ३३ जण पुढील फेरीत

कोल्हापुरात सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचा प्रारंभ झाला. त्यात पहिल्या दिवशी ३३ जणांनी पुढील फेरीत प्रवेश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देआर्यन पाटील, सूरज पालकरसह ३३ जण पुढील फेरीतकुस्ती निवड चाचणीला प्रारंभ; २२५ मल्लांचा सहभाग

कोल्हापूर : सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत प्रतिस्पर्धी मल्लाला नमवून आर्यन पाटील, सूरज पालकर, रोहित पाटील, प्रशांत मांगुरे यांच्यासह ३३ जणांनी मंगळवारी पुढील फेरीत प्रवेश केला.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ४१ वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जानेवारीमध्ये नागपूर येथे होणार आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा व शहर असे दोन संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी येथील मोतीबाग तालीम मंडळात निवड चाचणी होत आहे.

विविध गटांतील विजयी मल्ल असे : ४१ ते ४५ किलो वजनगट : आर्यन पाटील (राशिवडे), दत्तात्रय लांडगे (कांडगांव), यश पाटील (बेलवडे), ऋतिक बोबडे (कोल्हापूर). ४८ किलोगट : सूरज पालकर (केनवडे), ऋषिकेश आरडे (आरडेवाडी), संकेत पाटील (आमशी), ओंकार पाटील (कळंबे). ५१ किलोगट : रोहित पाटील (साबळेवाडी), संदेश पाटील (कासारवाडा), सुदर्शन पाटील (राशिवडे), वैभव पाटील (म्हारूळ). ५५ किलोगट : प्रशांत मांगुरे (पिंपळगाव), करण देसाई (भामटे), विवेक सावंत (गोरंबे), स्वप्निल पाटील (आमशी). ६० किलोगट : प्रदीप अणुसे (इचलकरंजी), विकास रेडेकर (कोतोली), तेजस मोरे (वाकरे), वेदांत पोवार (व्हनाळी). ६५ किलोगट : तेजस पाटील (बानगे), अनिकेत हवालदार (दिंडनेर्ली), प्रसाद पाटील (वाकरे), सुजित कणेरकर (बोरपाडळे). ७१ किलोगट : विजय शिंदे (मणदूर), स्वप्निल हरणे (कुडित्रे), यश पाटील (पट्टणकोडोली), हर्षद दानोळे (रेंदाळ). ८० किलोगट : धीरज कारंडे (बेले), धैर्यशील माने (वाकरे). ९२ किलोगट : नवनाथ गोटम (तांदुळवाडी), संदेश पाटील (कोथळी), सुदर्शन पाटील (पुनाळ).

या चाचणीत २२५ मल्ल सहभागी झाले. संभाजी वरूटे, संभाजी पाटील, प्रकाश खोत, बाबा शिरगावकर, कृष्णात पाटील, बाळू मेटकर, तानाजी पाटील, विलास पाटील, सिकंदर कांबळे, सूरज मगदूम, दादू चौगले यांनी पंच म्हणून काम पाहिले. 

 

Web Title: Kolhapur: 33 people including Aryan Patil and Suraj Palkar in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.