केरळचे ७० वर्षीय हरिबास्करन सोमवारी कोल्हापूरात, ४००० किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 02:23 PM2019-02-09T14:23:01+5:302019-02-09T15:38:45+5:30

वृद्धापकाळामध्ये नवी उभारी, नवी ऊर्जा देत नसलेल्या व्यक्तिंनी समाजाला मोठ योगदान दिले आहे. त्यापैकींच एक म्हणज केरळचे हरिबास्करन (वय ७०) होय.  सायकलवरून  केरळमधून निघालेले हरिबास्करन कर्नाटक प्रवास पूर्ण करून आता महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. सोमवारी ताराराणी चौकात सकाळी ११.३० वा.आगमन होणार असल्याची माहिती रविंद्र ढाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते चैन्नई ते दिल्ली असा ४००० किलोमीटर प्रवास पूर्ण करणार आहेत.

Kerala's 70-year-old Haribaskaran on Monday in Kolhapur | केरळचे ७० वर्षीय हरिबास्करन सोमवारी कोल्हापूरात, ४००० किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करणार

केरळचे ७० वर्षीय हरिबास्करन सोमवारी कोल्हापूरात, ४००० किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करणार

Next
ठळक मुद्देकेरळचे ७० वर्षीय हरिबास्करन सोमवारी कोल्हापूरात   ४ हजार किलाोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करणार : रविंद्र ढाळे

कोल्हापूर : वृद्धापकाळामध्ये नवी उभारी, नवी ऊर्जा देत नसलेल्या व्यक्तिंनी समाजाला मोठ योगदान दिले आहे. त्यापैकींच एक म्हणज केरळचे हरिबास्करन (वय ७०) होय.  सायकलवरून  केरळमधून निघालेले हरिबास्करन कर्नाटक प्रवास पूर्ण करून आता महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. सोमवारी ताराराणी चौकात सकाळी ११.३० वा.आगमन होणार असल्याची माहिती रविंद्र ढाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते चैन्नई ते दिल्ली असा ४००० किलोमीटर प्रवास पूर्ण करणार आहेत.

ढाळे म्हणाले, अलीकडच्या काळात धावपळ, ताणतणावामुळे विविध व्याधी तरुण वयातच ग्रासून टाकतात. वयाच्या ५० वर्षानंतर काम करण्याची क्षमता आणि ऊर्जा नसलेल्या अनेक व्यक्ति दृष्टिला पडतात. हरिबास्करन यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये संचालक आणि उपाध्यपदांवर काम केले आहे. त्यांचे आयआयटी व आयआयएम अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये शिक्षण झाले आहे.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सायकिंलगची आवड जोपासली. कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी भरवलेल्या सायकलिंग चळवळीत त्यांनी राजस्थानमध्ये २५० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला होता. ‘हेल्प एज’ ही देशातील ज्येष्ठ व्यक्तिंसाठी काम करणारी संस्था आहे. बहुतांश परावलंब वृद्धांना मानसिक आधार देण्याच्या दृष्टिने ही संस्था कार्यरत आहे.

या उद्देशाची जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ते कोल्हापूरात आल्यानंतर रेल्वेफाटक येथील ‘स्नेहधाम’ या संस्थेमध्ये ते ज्येष्ठ नागरिकांशी तर चंबुखडी (ता. करवीर) येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक , सायकलस्वारांच्या विविध संघटनांशी ते संवाद साधणार आहेत.

ते मंगळवारी (दि. १२) सकाळी सहा वाजता कऱ्हाडला प्रयाण करतील. केरळमध्ये या उपक्रमाची सुरुवात होऊन आणि तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान प्रवास करत दिल्लीत या उपक्रमांची सांगता होणार आहे. पत्रकार परिषदेस स्वरुपा कोरगांवकर, गिरीजा गोडे उपस्थित होते.

 

Web Title: Kerala's 70-year-old Haribaskaran on Monday in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.