राज्यघटनेला बाजूला ठेवून देशात कारभार : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:05 AM2018-12-02T00:05:38+5:302018-12-02T00:08:40+5:30

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, ...

Keeping the Constitution aside and operating in the country: Vasant Bhosale | राज्यघटनेला बाजूला ठेवून देशात कारभार : वसंत भोसले

बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांचे व्याख्यान झाले.

googlenewsNext
ठळक मुद्देयामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहेबेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

येथील ज्योती महाविद्यालयात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि दि सह्याद्री को-आॅप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेतील ‘राज्यघटना आणि सद्य:स्थिती’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना
भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते.

भोसले म्हणाले की, गेल्या काही वर्षांत संविधान बचाव आंदोलन सुरू झाले आहे. याला कारण सरकारचा व्यवहारच संशयास्पद वाटतो आहे. एवढेच नाही, तर राज्यघटनेचा वापर निवडणुकीपुरता करून आपल्याला हवा तसा कारभार चालविता येईल अशी समांतर व्यवस्था आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सध्याचे देशातील चित्र आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांशी फारकत सुरू आहे. त्यामुळे घटना बदलणे किंवा त्यामध्ये सुधारणा या गोष्टी आता मागे पडल्या आहेत.

राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, सर्वांना शिक्षण आणि विकासाची संधी देण्याच्या तत्त्वांबाबतही असेच चित्र आहे. सर्वसामान्यांसाठी शिक्षण आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शिक्षण घेणार आणि पुढे जाणार आहे. यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.

महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनल्याचे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अलीकडे केले आहे. यावरून शेतकºयांची अवस्था लक्षात येते. शेती, शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांसह रोजंदारी कर्मचाºयांची स्थिती चिंतनीय झाली आहे. समाजातील ७० टक्के वर्गाची अशी स्थिती झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर समाजात विघटन होण्याचा मोठा धोका आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला.

तत्पूर्वी म. फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी महिलांना समान हक्क कधी मिळणार असा सवाल शबरीमाला, शनिशिंगणापूर यासारखी महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्याची उदाहरणे देऊन केला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपक दळवी यांना अश्रू अनावर
संपादक वसंत भोसले यांनी आपल्या व्याख्यानात सीमाप्रश्न आणि काश्मीरच्या प्रश्नाने मी व्यथित होतो, असे सांगून मराठी भाषिक बहुसंख्येने असल्याने महाराष्टत सामील होण्याचा त्यांचा हक्क डावलला गेला आहे. तो मिळविण्यासाठी महाराष्टÑ एकीकरण समितीचा लढा अव्याहतपणे सुरू आहे. समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे, असे सांगताच श्रोत्यांमध्ये असलेले दीपक दळवी अत्यंत भावुक झाले. व्याख्यानानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी संपादकांना आलिंगन दिले. आपल्या लढ्याला बेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. सीमाप्रश्नासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title: Keeping the Constitution aside and operating in the country: Vasant Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.