कागल तालुका : उसाच्या वजनात हेक्टरी सरासरी १० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:14am

कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक

जहाँगीर शेख । कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक करीत असल्या तरी हंगामात नैसर्गिकरीत्या उसाचे टनेज वाढल्याने आणि त्याची सरासरी हेक्टरी १० टक्के इतकी असल्याने कारखान्यांना उसाची पुरेशी उपलब्धता होत आहे. उलट तोडणी-वाहतूक यंत्रणा अपुरी पडण्याचे प्रकार घडत आहे.

तालुक्यात दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हे साखर कारखाने आहेत, तर पंचगंगा इचलकरंजी, जवाहर-हुपरी, राजाराम-कोल्हापूर, व्यंकटेश्वरा-बेडकीहाळ, हालसिद्धनाथ-निपाणी, गुरुदत्त-टाकळी असे साखर कारखानेही तालुक्यात उसाची तोडणी करीत आहेत. एकीकडे उसाचे क्षेत्र फारसे वाढलेले नाही; मात्र उसाच्या टनेजमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही टनेज वाढ सरासरी हेक्टरी दहा ते बारा टन आहे. यामुळे कारखान्यांनाही उसाचा पुरवठा वाढला आहे. साधारणत: मार्चअखेर हंगाम चालण्याची शक्यता आहे.

आपला ऊस लवकर तुटावा म्हणून शेतकरी वर्ग ऊसतोडणी मजुरांना, त्यांच्या टोळ्यांना चुचकारत आहेत. तालुक्यातील साखर कारखान्यांनी ९० दिवसांचा यशस्वी हंगाम पूर्ण केला आहे. या हंगामात साधारणत: पाच महिने साखर कारखाने चालतील. यापैकी संताजी घोरपडे साखर कारखाना सर्वांत आधी चालू झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांना हा हंगाम सुरळीत आणि चांगला जात आहे. सहकारी साखर कारखान्यांचे गाळप ६ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपला ९० दिवसांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू साखर कारखान्याने पाच लाख ४४ हजार ३३० मे. टन उसाचे गाळप करीत १२.०५ टक्के साखर उतारा घेत ६ लाख ४० हजार ५५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे. बिद्री साखर कारखान्याने चार लाख ५० हजार ४२२ मे. टन उसाचे गाळप करीत १२.७० टक्के उताºयाने ५ लाख ६९ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर हमीदवाडा-मंडलिक कारखान्याने ३ लाख ६१ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी १२.३१ टक्के उताºयाने ४ लाख ४२ हजार १५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे.

तालुक्यातील दोन लाख मे. टन ऊस वाढला ४कागल तालुक्यातील साधारणत: १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१७ मध्ये पडलेल्या पावसाने आणि पूरक हवामानामुळे ऊस पिकाला मोठा लाभ होऊन उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गतवेळीपेक्षा हेक्टरी सरासरी १० ते १२ टन उसाचे जादा उत्पादन निघत आहे. सरासरी दोन लाख मे. टन ऊस वाढल्यासारखा हा प्रकार आहे. हा टनेजवाढीचा प्रकार लक्षात घेऊन साखर कारखानेही फेब्रुवारी २०१८ मध्ये ज्या कारखान्यांचे गाळप बंद होतात त्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

संबंधित

पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन
युती झाल्याने भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ
व्यापारी-उद्योजकांंची महापालिकेसमोर निदर्शने, सकारात्मक निर्णयाचे महापौरांचे आश्वासन
‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ११ मार्चला मोर्चा, मेळाव्यात निर्णय
ग्रामीण कारागिरांसाठी ‘महाखादी ब्रॅँड’ विकसित करू : एम. निलिमा केरकट्टा

कोल्हापूर कडून आणखी

पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन
युती झाल्याने भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ
व्यापारी-उद्योजकांंची महापालिकेसमोर निदर्शने, सकारात्मक निर्णयाचे महापौरांचे आश्वासन
‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ११ मार्चला मोर्चा, मेळाव्यात निर्णय
ग्रामीण कारागिरांसाठी ‘महाखादी ब्रॅँड’ विकसित करू : एम. निलिमा केरकट्टा

आणखी वाचा