लोकांच्या हाकेला धावून जाणारा ‘लोकमत’ प्रश्न सोडविणारी पत्रकारिता : कोल्हापूरकरांकडूनही भरभरून पाठबळ; सर्वसामान्यांना दिला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:11 AM2018-08-21T01:11:02+5:302018-08-21T01:11:37+5:30

समाजातील अडीअडचणी असोत की प्रश्न; ते सोडविण्यासाठी समाजाने हक्काने वृत्तपत्राकडे जावे व त्याने त्या प्रश्नांची दखल घेऊन सोडवणुकीसाठी प्रयत्न करावा, या प्रकारच्या पत्रकारितेला ‘लोकमत’ने महत्त्व दिले आहे.

 Journalism that solves the 'Lokmat' question that runs the public: Kolhapur supporters also support them; Justice given to ordinary people | लोकांच्या हाकेला धावून जाणारा ‘लोकमत’ प्रश्न सोडविणारी पत्रकारिता : कोल्हापूरकरांकडूनही भरभरून पाठबळ; सर्वसामान्यांना दिला न्याय

लोकांच्या हाकेला धावून जाणारा ‘लोकमत’ प्रश्न सोडविणारी पत्रकारिता : कोल्हापूरकरांकडूनही भरभरून पाठबळ; सर्वसामान्यांना दिला न्याय

googlenewsNext

कोल्हापूर : समाजातील अडीअडचणी असोत की प्रश्न; ते सोडविण्यासाठी समाजाने हक्काने वृत्तपत्राकडे जावे व त्याने त्या प्रश्नांची दखल घेऊन सोडवणुकीसाठी प्रयत्न करावा, या प्रकारच्या पत्रकारितेला ‘लोकमत’ने महत्त्व दिले आहे. त्यामुळेच ‘कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात लोकांच्या हाकेला धावून जाणारे वृत्तपत्र’ अशी ‘लोकमत’ची ओळख दृढ होत आहे.

‘लोकमत’ची गेल्या १४ वर्षांतील वाटचाल दमदारपणे झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे हे वृत्तपत्र कोल्हापूरचेही मुखपत्र बनले आहे. त्यामुळेच लोकांचेही खपापासून पाठबळापर्यंत सर्वच पातळ्यांवर मोठे सहकार्य मिळत आहे. त्याचीच दखल घेऊन ‘लोकमत’नेही हेल्पलाईन सुरू केली. त्या माध्यमातून सर्व बातमीदारांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून त्यांना प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातून कित्येक प्रश्न मार्गी लागले. आपण एखादा प्रश्न घेऊन ‘लोकमत’कडे गेल्यास त्याला न्याय मिळतो, हा विश्वास लोकांच्या मनांत निर्माण करण्यात ‘लोकमत’ यशस्वी झाला आहे. त्या विश्वासातूनच पेरीडच्या विधवा महिलेने पतीचे निधन झाल्यानंतर ‘महावितरण’कडून हक्काचे पेन्शन व इतर आर्थिक लाभ मिळत नसल्याची तक्रार साध्या पोस्ट कार्डावर लिहून केली. ‘लोकमत’ने त्याची दखल घेऊन, या विषयाचा कोल्हापूरपासून ‘महावितरण’च्या मुंबई कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला व त्यांना त्यांचे हक्काचे तब्बल १८ लाख रुपये मिळाले.

अशीच गोष्ट भुये (ता. करवीर) येथील अपंग महिलांची. त्या दोघीही अपंग. घसटत चालण्यात त्यांचे आयुष्य गेले. त्यांना ‘लोकमत’ हेल्पलाईनचा नंबर कुठून तरी मिळाला व त्यांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. ‘लोकमत’च्या बातमीदारांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची व्यथा समजून घेतली व बातमी प्रसिद्ध केल्यावर त्या महिलांसाठी मदतीचे अनेक हात पुढे आले. त्या भगिनींचीही मदतीची फारच माफक इच्छा. त्यांना दोन व्हीलचेअर मिळाल्या, वॉकर मिळाले, संसारोपयोगी भांडी मिळाली. गॅस मंजूर झाला. ‘हेल्पर्स’ संस्थेच्या कार्यकर्त्या त्यांना घेऊन सीपीआर रुग्णालयात गेल्या व त्यांचे अपंगत्वाचे दाखले काढले. माणुसकीच्या भावनेतून समाज किती भरभरून मदत करतो, याचे प्रत्यंतर या घटनेतून अनुभवास आले. हे सगळे घडले ‘लोकमत’च्या एका छोट्या बातमीने... एक बातमीच एखाद्याचे कसे जगणे सुसह्य करू शकते हेदेखील दिसले. असे एक ना अनेक अनुभव... ज्यातून लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. पत्रकारिता आसूड ओढणारी असावीच; परंतु ती प्रश्न सोडविणारीही असावी, या व्यापक भूमिकेतून ‘लोकमत’ची वाटचाल सुरू आहे व त्यास लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. हा प्रतिसादच नवं काही करण्यासाठी दहा हत्तींचं बळ देणारा आहे.

 

लोकमताची स्वत:हून दखल घेणारे वृत्तपत्र
‘लोकमत’ने गेल्या १४ वर्षांत जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतील लोकमताची दखल घेतली आहे, याचे कौतुक वाटते. ‘लोकमत’च्या संपादक, प्रतिनिधी यांच्याकडून स्वत:हून शोध घेऊन विविध उपक्रम, उपक्रमांमागील प्रेरणा यांना प्रसिद्धी दिली जाते, याचा अनुभव नेहमीच येतो. गर्जन शाळेच्या अवस्थेचे वृत्त कळताच ‘लोकमत’ने आपली टीम पाठवून दोन-तीन दिवस जे वृत्तांकन केले, त्यामुळे धडपडणारे शाळेचे शिक्षक आणि तरुणांना प्रेरणा मिळाली आणि आता ते आपले गाव उत्तम करण्याच्या प्रयत्नाला लागले, याचे बरेचसे श्रेय संपादक आणि ‘लोकमत’च्या जागरूक पत्रकार टीमकडे जाते. असे अनेक उपक्रम ‘लोकमत’ने राबविले, त्याबद्दल ‘लोकमत’च्या टीमला धन्यवाद देतो. ही पत्रकारिता अशीच फुलत राहो, ही सदिच्छा...! - सुरेश शिपूरकर, कोल्हापूर

Web Title:  Journalism that solves the 'Lokmat' question that runs the public: Kolhapur supporters also support them; Justice given to ordinary people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.