इंद्रजित देशमुख यांची स्वेच्छानिवृत्ती ! अर्जात घरगुती कारण : बदलीसाठी ‘व्यवहार’च्या उद्वेगातून निर्णयाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:54 AM2018-06-14T00:54:05+5:302018-06-14T00:54:05+5:30

ग्रामविकास विभागाच्या प्रशासनात स्वच्छ व पारदर्शी कारभार करून जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण केलेल्या इंद्रजित देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाकडे सादर केला आहे

 Indranjit Deshmukh's voluntary retirement! Domestic reasons for the change: The discussion of the decision through the tragedy of 'transaction' for transfer | इंद्रजित देशमुख यांची स्वेच्छानिवृत्ती ! अर्जात घरगुती कारण : बदलीसाठी ‘व्यवहार’च्या उद्वेगातून निर्णयाची चर्चा

इंद्रजित देशमुख यांची स्वेच्छानिवृत्ती ! अर्जात घरगुती कारण : बदलीसाठी ‘व्यवहार’च्या उद्वेगातून निर्णयाची चर्चा

googlenewsNext

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या प्रशासनात स्वच्छ व पारदर्शी कारभार करून जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण केलेल्या इंद्रजित देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाकडे सादर केला आहे. अर्जात त्यांनी घरगुती अडचणींमुळे स्वेच्छानिवृत्तीची मागणी करीत असल्याचे म्हटले असले तरी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणाºया लाखो रुपयांच्या मागणीच्या उद्वेगातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

चांगल्या अधिकाºयाच्या स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जामुळे बदल्यांतील आर्थिक व्यवहाराचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. देशमुख यांचा अर्ज मंजूर झाल्यास ते १ आॅगस्ट २०१८ पासून सेवामुक्त होऊ शकतील. सध्या ५२ वय असलेले देशमुख हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करीत आहेत. सर्वांना बरोबरघेऊन जाणारा अधिकारी, अत्यंत पारदर्शी व्यवहार अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा कधीच बंद नसतो.

सामान्य माणसाने कधीही त्यांच्या कार्यालयात त्यांची परवानगी न घेता त्यांना भेटायला यावे, ही ‘मुक्तद्वार’ संकल्पना त्यांनी राबविली आहे. ‘प्रेरणादायी व प्रबोधनात्मक व्याख्याते’ अशीही त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा अधिकारी घरगुती कारण सांगून जिल्हा परिषदेची सेवाच सोडून जात असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी खदखद आहे.
देशमुख यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कार्यकाल संपल्याने त्यांनी सातारा जिल्ह्यात बदली व्हावी असे प्रयत्न केले होते; परंतु त्यांना त्यात यश आले नाही; म्हणून हव्या त्या जिल्ह्यात पोस्टिंग व्हावे यासाठी कुणाच्या पाया पडायला जायला नको म्हणून त्यांनी या सेवेलाच निरोप द्यायचा निर्णय घेतला व त्यानुसार १ मे २०१८ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा अर्ज आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून ११ जून २०१८ रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या सचिवांकडे पाठविला आहे.

कर्मचाºयांत अस्वस्थता
जिल्हा परिषदेत काही लोक गैरव्यवहार करीत असले तरी अनेक अधिकारी व कर्मचारीही प्रामाणिकपणे काम करणारे आहेत. त्यांना देशमुख यांचा मोठा आधार होता. तेच स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे समजल्यावर त्यांच्यातही अस्वस्थता होती.

स्वेच्छानिवृत्ती नको म्हणून मोठा दबाव
देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याचे व त्यांचा प्रस्ताव प्रशासनाने सचिवांकडे पाठविला असल्याचे समजल्यावर बुधवारी दिवसभर त्यांना भेटण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची रीघ लागली. विविध संघटनांनीही त्यांच्याकडे ‘असा निर्णय घेऊ नका’ म्हणून आग्रह धरला; परंतु देशमुख यांनी त्या सर्वांचे फक्त शांतपणे म्हणणे ऐकून घेतले.

 

देशमुख यांच्या सेवेबद्दल
आजअखेर एकूण सेवा : २४ वर्षे ०८ महिने ७ दिवस
स्वेच्छानिवृत्तीची १ मे २०१८ पासून तीन महिन्यांची नोटीस

 

देशमुख यांनी सातारा येथे बदलीसाठी विनंती केली आहे; परंतु सरकार तिथे त्यांची बदली करण्यास तयार नाही. बदलीची ‘किंमत’ देण्याचा त्यांचा पिंड नाही; त्यामुळे त्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती बरी, या उद्वेगातून त्यांनी अर्ज केला आहे. त्यांच्यासारख्या अधिकाºयाला सेवेतून अशा तºहेने जाऊ देणे शोभादायक नाही, असे मी आजच मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्रालयाला कळविले आहे.
- राजू शेट्टी, खासदार
 

 

Web Title:  Indranjit Deshmukh's voluntary retirement! Domestic reasons for the change: The discussion of the decision through the tragedy of 'transaction' for transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.