कोल्हापूर जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:01am

कोल्हापूर : यंदा पावसाने शेतकºयांची दमछाक केली असली तरी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्याच्या भूगर्भातील पाणी

राजाराम लोंढे । कोल्हापूर : यंदा पावसाने शेतकºयांची दमछाक केली असली तरी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्याच्या भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा दीड फुटांनी पाणी पातळी वर सरकल्याने यंदा पाणीटंचाईच्या झळा फारशा सहन कराव्या लागणार नाही. हातकणंगले व शिरोळची सरासरी गतवर्षीपेक्षा सुधारली असली तरी पाच वर्षांच्या तुलनेत कमीच राहिली आहे.

कोल्हापूर जिल्हा ‘पाणीदार’ जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्याला कारणेही तशीच असून जिल्ह्यात सरासरी १७७२ मिलीमीटर पाऊस होतो. जोरदार पाऊस व धरणांमुळे येथे मुबलक पाणी उपलब्ध आहे; पण गेल्या तीन-चार वर्षांपासून कोल्हापूरकरांनाही दुष्काळाची झळ बसू लागली आहे. गेल्यावर्षी तर वार्षिक सरासरीच्या केवळ ४८ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला होता.

पाण्याच्या पातळीत सव्वा दोन फुटांनी घसरण झाल्याने फेबु्रवारीनंतर पाणीटंचाई जाणवू लागली. यंदा जून, जुलैमध्ये मोठा नसेना पण एकसारखा जिरवणीचा पाऊस झाला. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला, पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अखंड आॅक्टोबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाच महिन्यांत जिल्ह्णात सरासरी १३८९.३४ मिलीमीटर (७८ टक्के) पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली.गेल्यावर्षी जानेवारीमधील पाणीपातळीच्या तुलनेत गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पातळी गेल्यावर्षीपेक्षा वाढली असली तरी मागील पाच वर्षांच्या तुलनेत थोडी घसरली आहे. जांभ्यामुळे पातळी खाली गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत चांगला पाऊस होतो; पण या तालुक्यातील पातळी ४-५ फुटांपर्यंत खाली असते. येथे जांभ्या दगडाचा थर असल्याने पावसाचे पडलेले पाणी जमिनीत न झिरपता ते मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळेच पाणी पातळीत सुधारणा होत नाही. तालुकानिहाय सरासरी व यंदा झालेला पाऊस (मिलीमीटर) तालुका सरासरी पाऊस यंदाचा पाऊस हातकणंगले ८२०.४० ६२८.८७ शिरोळ ३८५.३० ६४२.४१ पन्हाळा १४१६.२० १३३२.६२ शाहूवाडी १५४२.३० १८४३.५० राधानगरी ३५०१.६० १७८५.६० गगनबावडा ५६२९.४० ३२५२.०० करवीर ७९६.९० ८१९.७७ कागल ६४९.६० १०६८.६९ गडहिंग्लज ७८४.६० ७२९.४० भुदरगड १३४३.७० १३६१.४० आजरा १७८९.७० १५३४.५० चंदगड २६०९.०० १६७३.२७ जानेवारीमधील सर्वेक्षणानुसार तालुकानिहाय भूजल पातळी (मीटर ) तालुका जानेवारी २०१६ आॅक्टोबर २०१७ करवीर ३.८४ १.२४ कागल २.३४ १.३६ पन्हाळा ३.७८ १.७२ शाहूवाड ५.९० २.७४ हातकणंगले ४.६४ २.३८ शिरोळ ४.७० २.६८ राधानगरी २.८६ १.२१ गगनबावडा ६.०० ३.४५ भुदरगड ४.२६ २.५४ गडहिंग्लज ३.३५ १.९१ आजरा ३.८९ १.८५ चंदगड ७.८४ ४.३७

संबंधित

‘अमृत’ योजनेचा कार्यादेश जारी; ४२६ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलणार
वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली
ठाणे : पाणीगळतीवर उतारा वॉटर आॅडिटचा , २४ तास पाणी : पालिकेचा प्रस्ताव, ९५.४६ कोटी खर्च
झोपडपट्टी भागाला मिळणार एका रुपयात एक लीटर शुध्द पिण्याचे पाणी
पिंपरी-चिंचवड: पाणी आरक्षण वाढीसाठी साकडे: जलसंपदामंत्री, पालकमंत्र्यांसोबत लवकरच घेणार बैठक

कोल्हापूर कडून आणखी

कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
सिंह राशीतील उल्कावर्षावाचा आज रात्री बारा वाजता घ्या अनुभव
...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला
कोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर महिलेचा पती-मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न
शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु

आणखी वाचा