मानबेटमधील अवैध स्टोन क्रशर अखेर सील- महसूलची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:52 AM2019-05-09T00:52:20+5:302019-05-09T00:52:51+5:30

दाजीपूर अभयारण्याच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मानबेट (ता. राधानगरी) येथे अवैधरीत्या सुरू असणारा स्टोन क्रशर अखेर महसूल प्रशासनाकडून सील करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर दगड खडी, दोन ट्रॅक्टर व दोन जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. याबाबत बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.

 An illegal stone crusher in the mennet is finally sealed- Revenue action | मानबेटमधील अवैध स्टोन क्रशर अखेर सील- महसूलची कारवाई

बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत’च्या वृत्तानंतर दखल

म्हासुर्ली : दाजीपूर अभयारण्याच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मानबेट (ता. राधानगरी) येथे अवैधरीत्या सुरू असणारा स्टोन क्रशर अखेर महसूल प्रशासनाकडून सील करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर दगड खडी, दोन ट्रॅक्टर व दोन जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. याबाबत बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.

चौके, मानबेट, राही, कंदलगाव या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मानबेट गावानजीक डवरी यांच्या शेतामध्ये रस्ता कामाच्या नावाखाली गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही परवानगीशिवाय व रॉयल्टी न भरता अवैधरीत्या स्टोन क्रशर सुरू असून, मोठ्या प्रमाणावर खडीची निर्मिती करून ती परिसरात विकली जात होती. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला होता. शासनाचीही लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी सविस्तर प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन नायब तहसीलदार विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी मानबेट
येथील क्रशरच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून क्रशर सील केलाआहे.


तहसीलदारांकडून पुढील कारवाई
याबाबत राधानगरीचे नायब तहसीलदार विजय जाधव म्हणाले, बुधवारी आम्ही मानबेट या ठिकाणी क्रशरची पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची परवानगी आढळून आली नाही. हा क्रशर सील केला असून, दोन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी तसेच दगड आणि खडी जप्त केली आहे. याबाबतचा अहवाल तहसीलदारांना देणार असून, पुढील कारवाई तहसीलदार यांच्याकडून होईल.

Web Title:  An illegal stone crusher in the mennet is finally sealed- Revenue action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.