भाऊ नाही तर मी कशाला जगू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:17 AM2018-04-27T01:17:48+5:302018-04-27T01:17:48+5:30

I will live without my brother! | भाऊ नाही तर मी कशाला जगू!

भाऊ नाही तर मी कशाला जगू!

Next



घन:शाम कुंभार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि अपघातग्रस्त सूरजचाही मृत्यू झाला. नियतीच्या या धक्क्याने कदम कुटुंबाचे अस्तित्वच संपुष्टात आले. जिवाला चटका लावणाऱ्या लागोपाठ दोन भावांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
चिकोडी तालुक्यातून सात ते आठ वर्षांपूर्वी कदम कुटुंबीय कामासाठी इचलकरंजी परिसरात आले होते. दोन भाऊ, एक बहीण व वडील असा छोटा परिवार. बहिणीचे नांदणी येथील श्रवण जोगदंडे यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यानच्या काळात कदम यांच्या वडिलांचे छत्र हरपल्याने ते पोरके झाले होते.
नांदणी येथील त्यांच्या बहिणीचा संसार फुलत असतानाच तिचा दोन वर्षांपूर्वी बाळंतपणातच मृत्यू झाला होता. हा आघातही कदम बंधूंच्यावर होता. थोरला बंधू आकाश कदम हातकणंगले परिसरात काम करीत असल्याने तो खोतवाडी येथे भाड्याने राहत होता, तर सूरज कदम हा नांदणीमध्येच स्वतंत्र राहत होता.
सूरज हा जयसिंगपूरला मोटारसायकलीवरून येत असताना दोन दिवसांपूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची अवस्था पाहून तो वाचू शकणार नाही, असा समज मोठा भाऊ आकाशला झाल्याने तो नाराज झाला. वडील गेले, बहीण गेली, भाऊही गेला तर मी राहून काय करू, असे मित्रांना म्हणाला आणि खोतवाडी येथील आपल्या खोलीत गेला. तेथे आकाश गेल्यावर त्याने आत्महत्या करण्यासाठी केलेली तयारी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या मित्रांना दाखविली. मित्रांनी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिथे मित्र पोहोचूपर्यंत त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. दुसºया दिवशी अपघातग्रस्त असलेला भाऊ सूरज याचाही मृत्यू झाला. वडिलांचे निधन, बहिणीचा मृत्यू व दोन भावांचाही झालेला घात यामुळे कदम कुटुंबच संपून गेले.

Web Title: I will live without my brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.