पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, मद्यपीमुळे कोल्हापूर पोलिसांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:25 PM2018-09-21T14:25:22+5:302018-09-21T14:30:38+5:30

गुरुवार, वेळ दुपारची...एकजण मद्यप्राशन करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला. पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, असे तो सांगू लागला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी त्याच्या घराकडे पाठविले; पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे घरी गेल्यावर पोलिसांना समजले.

I have lost my wife and child, drinking liquor of Kolhapur police due to drunkenness | पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, मद्यपीमुळे कोल्हापूर पोलिसांची तारांबळ

पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, मद्यपीमुळे कोल्हापूर पोलिसांची तारांबळ

Next
ठळक मुद्देपत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, मद्यपीमुळे कोल्हापूर पोलिसांची तारांबळप्रकार घडला नसल्याची खातरजमा, पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

कोल्हापूर : गुरुवार, वेळ दुपारची...एकजण मद्यप्राशन करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला. पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, असे तो सांगू लागला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी त्याच्या घराकडे पाठविले; पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे घरी गेल्यावर पोलिसांना समजले.

याबाबतची माहिती अशी की, दौलतनगर परिसरातील एकजण मद्यप्राशन करून पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी आला. ‘मी मुलाला व पत्नीला संपविले आहे’ असे तो ठाणे अंमलदाराला सांगू लागला. हे ऐकून खातरजमा करण्यासाठी चार-पाच पोलीस दौलतनगर येथे ठाणे अंमलदाराने त्याच्या घराजवळ पाठविले.

दौलतनगरात नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर पोलीस त्या मद्यपीच्या घरी गेले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडून पोलिसांनी आत पाहिले, तर मुलगा घरात जेवत बसला होता. पोलिसांनी ‘आई कुठे आहे ’ अशी विचारणा मुलाकडे केल्यावर त्याने ‘आई कामास गेली’ असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्या मद्यपीला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटाप्रमाणे बोलू लागला. ‘माझी आणि बायकोची भांडणे झाली होती; त्यामुळे ‘मी तिला मनातून काढून टाकली’असे त्याने पोलिसांना सांगितले; मात्र त्याच्या या प्रकाराबद्दल पोलिसांची एक तास तारांबळ उडाली.
 

 

Web Title: I have lost my wife and child, drinking liquor of Kolhapur police due to drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.