हिटणी-नूल नवीन पुलासाठी जनआंदोलनाची तयारी : हिटणीकरांना मिळणार आरोग्य-शिक्षण सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:19 AM2018-05-19T00:19:35+5:302018-05-19T00:19:35+5:30

 Hitni-Nool Preparation for mass movement for new bridge: Hitachi will get health-education facilities | हिटणी-नूल नवीन पुलासाठी जनआंदोलनाची तयारी : हिटणीकरांना मिळणार आरोग्य-शिक्षण सुविधा

हिटणी-नूल नवीन पुलासाठी जनआंदोलनाची तयारी : हिटणीकरांना मिळणार आरोग्य-शिक्षण सुविधा

googlenewsNext
ठळक मुद्देअरळगुंडी, कडलगे, नांगनूर, खणदाळ, नूल ग्रामस्थांची होणार सोय

राम मगदूम ।
गडहिंग्लज : हिटणी ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
सहजपणे उपलब्ध होण्यासाठी आणि गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील अरळगुंडी, कडलगे, नांगनूर व खणदाळ या चार खेड्यांना तालुक्याच्यागावी गडहिंग्लजला येण्या-जाण्याचे अंतर कमी होण्यासाठी हिरण्यकेशी नदीवर ‘हिटणी-नूल’ दरम्याननवीन पूल बांधण्याची गरज आहे.या मागणीसाठी पूर्वभागातीलजनता उठाव करण्याच्या पावित्र्यात आहे.‘निलजी-नूल’ बंधाऱ्या पुढील गावांनाही ‘चित्री’चे पाणी हक्काने मिळावे, ही मागणी जोर धरली असतानाचा ‘हिटणी-नूल’ पुलाची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे अनेक वर्षे विकासापासून दूर असणारी पूर्वभागातील जनता दळणवळणासाठी रस्ते, सार्वजनिक आरोग्य सेवा आणि शेती व पिण्याचे पाणी या मूलभूत प्रश्नासंदर्भात जागृत आणि संघटित होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘हिटणी’ हे सुमारे ३५०० हजार लोकवस्तीचे गाव ‘गडहिंग्लज-संकेश्वर’ या सध्याच्या राज्य महामार्गावरील आणि नियोजित ‘संकेश्वर-आंबोली’ राष्ट्रीय महामार्गावर गडहिंग्लजपासून १५ कि. मी. अंतरावर आहे. हिटणी नाक्यापासून गाव सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथील जागृत देवस्थान श्री. बसवेश्वर मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटनस्थळात झाला आहे. येथे दर्शनाला येणाºया सीमाभागातील भाविकांची संख्याही मोठी आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे भाविकांची मोठी कुचंबणा होत आहे.

हिटणी गावातील कांही शेतकºयांच्या जमिनी नदीच्या
पलीकडे नूल व खणदाळच्या हद्दीत आहेत, तर नूल व खणदाळच्या
जमिनी हिटणी गावच्या हद्दीत आहेत. त्यामुळे दोन्हीकडील शेतकºयांना सध्या केवळ ‘होडी’चाच आधार आहे. दरम्यान, होडी नादरुस्त झालेस १५ ते २० कि.मी. अंतराचा फेरा करावा लागतो. शेती कसण्यासाठी आणि शेतीमाल वाहतुकीसाठी पूल होणे गरजेचे आहे. त्यामुळेच पुलाच्या मागणीसाठी शेतकरीदेखील सरसावले आहेत.
हिटणी हे गाव नूल प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे. मात्र, रस्त्याची सोय नसल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवाहिटणी ग्रामस्थांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच आहे. नूलच्या आरोग्य केंद्राला जाण्यासाठी तब्बल २० किलोमीटरचा फेरा पडत आहे. ‘हिटणी-नूल’ दरम्यान पूल झाल्यास नूलला जाण्यासाठी १० ऐवजी केवळ ३ किलोमीटरमध्ये पोहोचता येणार आहे, त्यामळे नवीन पुलाची मागणी जोर धरत आहे.

५५आरोग्य सेवा मिळणार
हिटणीतील एखादा अत्यवस्थ रूग्ण किंवा अडलेल्या महिलेला प्रसुतीसाठी संकेश्वर किंवा गडहिंग्लजला जावे लागते. मात्र, पूल झाल्यास ग्रामस्थांना अवघ्या ३ कि. मी. अंतरावरील नूल प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आपत्तकालीन परिस्थितीत हा पूल ग्रामस्थांचा ‘जीवनदूत’ ठरणार आहे.

सामानगड-हिटणी-काळभैरी कॉरिडॉर
शिवकालीन ऐतिहासिक किल्ले सामानगड किल्ला हिटणीपासून १३ कि. मी. अंतरावर आहे. हिटणी-नूल दरम्यान पुलाची सोय झाल्यास सामानगडावर येणारे पर्यटक दर्शनासाठी हिटणी येथील प्राचीन बसवेश्वर मंदिराला येऊ शकतात. त्याप्रमाणेच हिटणीपासून २० किलोमीटर अंतरावरील गडहिंग्लजनजीकच्या श्री काळभैरी मंदिरापर्यंतचा पर्यटनाचा कॉरिडॉरही नव्या पुलामुळे विकसित होऊ शकतो. त्यादृष्टीनेही शासनाने विचार करण्याची गरज आहे.
 

हिटणी गाव नूल प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे. मात्र, दळणवळणाची सोय नसल्याने ग्रामस्थांसाठी सेवा केवळ नावापुरतीच आहे. तसेच गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळेच आपण पुलासाठी आग्रही आहे.
- सुजाता कंकणवाडी, सरपंच हिटणी.

Web Title:  Hitni-Nool Preparation for mass movement for new bridge: Hitachi will get health-education facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.