हमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:53 PM2018-12-17T13:53:12+5:302018-12-17T13:56:48+5:30

गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ एकाचा दगडाने डोके ठेचून अमानुष खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून गांधीनगर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे.

Hameedwada stone crushed by a stone | हमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खून

हमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खून

ठळक मुद्देहमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खूनगांधीनगर येथील प्रकार, दोघे संशयित ताब्यात

कोल्हापूर : गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ एकाचा दगडाने डोके ठेचून अमानुष खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून गांधीनगर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे.

गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीचा खून झाला. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असून राजेंद्र कुरणे (वय ४०) असे त्याचे नाव आहे. किरकोळ कारणावरुन हा खून झाल्याचा संशय आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. करवीरचे पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनीही घटनास्थळाला भेट दिली असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: Hameedwada stone crushed by a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.