गनिमी काव्याने ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम पाऊण तास महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:12 AM2018-07-20T01:12:22+5:302018-07-20T01:12:44+5:30

गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे,’ या मागणीसाठी गुरुवारी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने पुणे-बंगलोर महामार्गावर ‘चक्का जाम’ केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनावरांसह पाऊण तास महामार्ग रोखून धरल्याने

 The guerrilla poet stopped the road of 'self-respect' to stop the highway | गनिमी काव्याने ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम पाऊण तास महामार्ग रोखला

गनिमी काव्याने ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम पाऊण तास महामार्ग रोखला

Next
ठळक मुद्दे: पोलिसांच्या धरपकडीने कार्यकर्ते आक्रमक; तणावपूर्ण वातावरण

कोल्हापूर / किणी / खोची : ‘गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे,’ या मागणीसाठी गुरुवारी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने पुणे-बंगलोर महामार्गावर ‘चक्का जाम’ केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनावरांसह पाऊण तास महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यात पोलिसांकडून आंदोलनाचा दडपण्याचा प्रयत्न झाला, पण कार्यकर्त्यांनी न जुमानता गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी केले.

खासदार राजू शेट्टी यांनी ‘चक्का जाम’आंदोलनाची हाक दिल्यानंतर बुधवारी रात्रीपासूनच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ‘वॉच’ ठेवून अनेकांना ताब्यात घेतले होते. गुरुवारी सकाळपासूनच पोलिसांनी तावडे हॉटेल ते किणी टोलनाका या मार्गावर पोलिसांची मोठी कुमक उभी केली होती. गेली दोन दिवस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असल्याने आंदोलन दडपायचेच, असे पोलीस यंत्रणेचे मनसुबे होते. साडेअकरा वाजता जिल्हाध्यक्ष भगवान काटे, रमेश भोजकर यांच्यासह कार्यकर्ते किणी येथे आले. त्यांची व पोलिसांची शाब्दिक चकमक उडाल्यानंतर काटे व भोजकर हे महामार्गावर वाहनांच्या आडवे पडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. त्याच वेळेला जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल मादनाईक, प्रा. जालंदर पाटील आदी प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन आंदोलनकर्त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्ते गमिनी काव्याने हळूहळू महामार्गावर येत होते, पण एकत्रित न थांबता मिळेल त्या आडोशाला उभे राहून पोलिसांची नजर चुकवत होते. भगवान काटे महामार्गावर थांबून कार्यकर्त्यांना सिग्नल देत होते. दीड वाजता किणी गावातून अनिल मादनाईक, प्रा. जालंदर पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते जनावरांसह महामार्गावर उतरले. हातात ‘स्वाभिमानी’चे झेंडे, राजू शेट्टींच्या विजयाच्या घोषणा देत आक्रमकपणे कार्यकर्ते महामार्गावरून पुढे सरकू लागल्यानंतर पोलीस यंत्रणा हडबडली. पोलिसांनी नाक्याच्या अलीकडेच अडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कार्यकर्ते नाक्यावर धडकले आणि वातावरण एकदमच तणावपूर्ण बनले. घोषणांच्या माध्यमातून कार्यकर्ते आपल्या मनातील राग व्यक्त करत राहिल्याने कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण स्वस्तिक पाटील, अनिल मादनाईक यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

अनिल मादनाईक म्हणाले, दूध उत्पादक अडचणीत आल्यानेच त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. सामान्य माणसाला त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, पण आमच्या वेदना समजावून घ्या. येथे कोणत्याही प्रकारची तोडफोड केली जाणार नाही.
प्रा. जालंदर पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार शांततेत आंदोलन केले जाणार आहे, आम्हाला सन २०१२ ची पुनरावृत्ती करायची नाही. आम्हाला नुसते दात खुपसायचे नाहीत. एकदा दात खुपसले तर ते मुळासह उपटून काढतो. त्यामुळे कोणी दडपशाहीचा मार्ग अवलंबू नये. दूध उत्पादकांच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. पाण्यापेक्षा कमी दराने दूध विकताना राज्यकर्त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना रस्त्यावरीलच भाषा कळते. कर्नाटक, केरळप्रमाणे येथे एकच संघ करण्याची (पान २ वर)

टोल बंद ...वाहने सुसाट!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किणी नाक्यावरील टोलवसुली सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. तेथून येणाऱ्या-जाणाºया वाहनांना तत्काळ पुढे सरकता यावे, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नाक्यावरून वाहने सुसाटच जात होती. दुपारी दोननंतर टोलवसुली पुन्हा सुरू झाली.

शेट्टींच्या इशाºयानंतर पोलीस नरमले
आंदोलन दडपायचे, या इराद्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. भगवान काटे, जालंदर पाटील व अनिल मादनाईक या प्रमुख शिलेदारांना ताब्यात घेतल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस यंत्रणेला दम दिला. ‘कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन चिरडाल तर याद राखा, उद्या महाराष्टÑ पेटेल’ असा इशारा दिल्यानंतर पोलीस नरमले.
तुपकरांच्या सूचना
युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे आंदोलनासाठी कोल्हापूरकडे निघाले, पण पुण्यापासून त्यांच्यावर पोलिसांची नजर होती. ते गाड्या बदलत कोल्हापूरच्या सीमाभागात आले, पण त्यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा अज्ञातस्थळी राहूनच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title:  The guerrilla poet stopped the road of 'self-respect' to stop the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.