रस्ते, गटारींच्या पलीकडे जाऊन गावांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:29am

कोल्हापूर : रस्ते, गटारींसाठी निधी द्या, या मागणीसाठी बहुतांश सरपंच लोकप्रतिनिधींकडे येत असतात; पण या गोष्टी पाच वर्षांत खराब होत राहणार आणि त्या पुन्हा कराव्या लागतात. या पलीकडे जाऊन विकासाची विषयपत्रिका तयार करून सरपंचांनी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. विरोधक हा आपल्या कामकाजाचा आॅडिटर ...

कोल्हापूर : रस्ते, गटारींसाठी निधी द्या, या मागणीसाठी बहुतांश सरपंच लोकप्रतिनिधींकडे येत असतात; पण या गोष्टी पाच वर्षांत खराब होत राहणार आणि त्या पुन्हा कराव्या लागतात. या पलीकडे जाऊन विकासाची विषयपत्रिका तयार करून सरपंचांनी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. विरोधक हा आपल्या कामकाजाचा आॅडिटर असतो; त्याला विरोध करीत बसण्यापेक्षा सोबत घेऊन वाटचाल केल्यास विकासाला अधिक गती येते, असेही त्यांनी सांगितले. वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा असतो. लोकमान्य टिळक यांनी उभी केलेली चळवळ ‘लोकमत’ने वाढविली असून ‘सरपंच अवॉर्ड’ नवोदित सरपंचांना प्रेरणादायी असल्याचे सांगत शौमिका महाडिक म्हणाल्या, अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित पदाधिकारी चुकीच्या गोष्टीसाठी प्रतिष्ठा पणाला लावतात, ही खरी समस्या आहे. महिलाच खºया अर्थाने विकासाला गती देतात; कारण त्यांच्या हातून नियमबाह्य व चुकीचे काम होत नाही, याची आपणाला खात्री आहे. आता तर जिल्हा परिषदेच्या महिला पदाधिकाºयांच्या कारभारात त्यांच्या नातेवाइकांना हस्तक्षेप करता येणार नाहीच; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आवारातही त्यांना फिरता येणार नाही, असा शासन अध्यादेश निघाला आहे. त्यामुळे महिलांनी नेतृत्व आपल्या हातात घेऊन विकासकामांसाठी झोकून द्यावे. नेतेगिरी पोकळ असते पद मिळाले की अधिकाºयांना दम देण्यासह नेतेगिरी सुरू होते. हा माणसाच्या अंगात अनुवंशिक दोष आहे. पदावर महिला असो किंवा पुरुष; समानतेने काम केले पाहिजे. त्या खुर्चीत मोठी शक्ती असते. अशा वागण्याने विकास साधता येत नसल्याची कोपरखळीही महाडिक यांनी मारली.

संबंधित

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र
शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी महामार्गावर आंदोलन, एन. डी. पाटील यांच्या लढ्याला यश
शहरात दिवसा प्रवेशासाठी ‘रेडिमिक्स काँक्रिट’च्या वाहनांना सवलत द्यावी
जेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम
बोंद्रेनगर येथे घरफोडी, एक लाख किंमतीचा ऐवज लंपास

कोल्हापूर कडून आणखी

वृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धडक मोर्चा
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र
शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी महामार्गावर आंदोलन, एन. डी. पाटील यांच्या लढ्याला यश
शहरात दिवसा प्रवेशासाठी ‘रेडिमिक्स काँक्रिट’च्या वाहनांना सवलत द्यावी
जेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम

आणखी वाचा