मुलींनो, स्वसंरक्षणासाठी मिरचीपूड बॅगेत ठेवा--सुप्रिया सुळे यांचा सल्ला :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:04 AM2017-09-21T01:04:28+5:302017-09-21T01:05:46+5:30

 Girls, keep pepper bags for self defense - Supriya Sule's advice: | मुलींनो, स्वसंरक्षणासाठी मिरचीपूड बॅगेत ठेवा--सुप्रिया सुळे यांचा सल्ला :

मुलींनो, स्वसंरक्षणासाठी मिरचीपूड बॅगेत ठेवा--सुप्रिया सुळे यांचा सल्ला :

Next
ठळक मुद्दे युवा संवाद यात्रेस प्रचंड प्रतिसादत्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षताही घ्या;

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुलींनी स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅगेत मिरची पूड ठेवावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे दिला, परंतु हे करत असताना त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षताही घ्या; असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

सदर बाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, युवतींवरील अत्याचार व युवकांच्या व्यसनाधीनता विरोधातील युवा संवाद यात्रांतर्गत आयोजित ‘जागर हा जाणीवांचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महापौर हसिना फरास, खा. धनंजय महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, सरोज पाटील, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, प्राचार्य सी. जे. खिलारे, नाविद मुश्रीफ, राजेश लाटकर, भैया माने, अनिल साळोखे, आदिल फरास आदी उपस्थित होते. यावेळी खा. सुळे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद साधला.

युवक-युवतींनी आपल्या अडचणी मांडताना सडकसख्याहरींकडून होणाºया त्रासाबद्दल सांगितले. एका युवतीने शाहू मैदान बसस्टॉप येथे सकाळी व सायंकाळी तरुणांचे टोळके मुलींची छेडछाड करत असल्याचे सांगितले. यावर खा. सुळे यांनी या ठिकाणी किमान १५ दिवस पोलीस पथक ठेवावे अशी सूचना महापौर हसिना फरास यांना केली. आपल्यावर छेडछाडीसारखा प्रसंग उद्भवत असेल तर आपल्याला वाचवायला कोण हिरो येईल याची वाट न बघता स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅगेत मिरची पूड ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
खा. महाडिक यांनी युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे घेण्याची गरज असल्याचे सांगितले. युवा शक्ती व भागीरथी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १६००० युवतींना असे प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मविश्वास निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

छेडछाडीला राजकीय वरदहस्त
छेडछाड करणाºया मुलांना सोडवायला खासदार तसेच राजकीय लोकांचे पाठबळ असते. त्यामुळेच असे प्रकार घडतात, असे संभाजी पोवार या युवकाने सांगितले. त्यावर खा. सुळे यांनी ‘तू माझ्या मतदारसंघात येऊन हे सिद्ध केल्यास मी पदाचा राजीनामा देईन,’ असे सांगितले.

खा. महाडिक म्हणाले, ‘अशा प्रकारांना खासदार पाठबळ देतात; असे वक्तव्य करणे चुकीचे आहे.’
‘मुलींची छेड काढणाºयाला कोण पाठीशी घालेल,’ अशी विचारणा त्यांनी केली. यावर त्या युवकाने माझा रोख व्यक्तिगत तुमच्यावर नव्हता, तर वास्तवातील मानसिकतेवर होता, असे स्पष्ट केले.

Web Title:  Girls, keep pepper bags for self defense - Supriya Sule's advice:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.