कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:06 PM2019-01-16T18:06:35+5:302019-01-16T18:08:03+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १८) होत असून, पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या शहरातील सात नाल्यांशेजारील आवश्यक ती जागा संपर्क मार्गाकरिता आरक्षित करण्याचे प्रस्ताव तसेच अंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप असा फेरबदल करण्याचा प्रस्तावही नगररचना विभागाने मंजुरीकरिता या सभेसमोर ठेवला आहे.

General Meeting of Kolhapur Municipal Corporation on Friday | कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारीअंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप

कोल्हापूर : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १८) होत असून, पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या शहरातील सात नाल्यांशेजारील आवश्यक ती जागा संपर्क मार्गाकरिता आरक्षित करण्याचे प्रस्ताव तसेच अंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप असा फेरबदल करण्याचा प्रस्तावही नगररचना विभागाने मंजुरीकरिता या सभेसमोर ठेवला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषण करणारे नाले अडवून त्यांवर बंधारे, स्क्रीन चेंबर, वेटवेल बांधणे, इत्यादींकरिता आवश्यक संपर्कमार्गाकरिता जागा आरक्षित करावी लागणार आहे. तसेच झोनही बदलावे लागणार आहेत. लक्षतीर्थ, जुना बुधवार, वीटभट्टी, सीपीआर, रमणमळा, राजहंस, ड्रीमवर्ल्ड येथील नाल्यांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे प्रस्ताव नगररचना विभागाने दिले आहेत. त्यावर या सभेत निर्णय होणार आहे.

अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजूर झालेला आहे. या आरखड्यात दर्शन मंडप हा एक प्रमुख भाग आहे; परंतु त्या ठिकाणी दर्शन मंडपाकरिता आरक्षित जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर दर्शन मंडप असा फेरफार करण्याचा प्रस्तावही सभेत चर्चेला येणार आहे.

शहर हद्दीतील २०० चौरस मीटरच्या आतील बांधकाम परवानगी पूर्ववत विभागीय कार्यालयाकडे देण्याचा सदस्य ठराव विषयपत्रिकेवर आहे.

कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारणे, महावीर उद्यानात भगवान महावीर यांचा पुतळा उभारण्यास जागा द्यावी, लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केटमधील आठ गाळे कोल्हापूर जिल्हा हज कमिटीला संपर्क कार्यालयास भाडेतत्त्वावर द्यावेत, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या सद्य:स्थितीची श्वेतपत्रिका काढावी, कोळेकर तिकटी, सणगर गल्ली तालीम ते पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या रस्त्यास ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक यशवंत भालकर यांचे नाव देण्यात यावे, असे सदस्य ठरावही सभेसमोर चर्चेला येणार आहेत.

Web Title: General Meeting of Kolhapur Municipal Corporation on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.