हुपरी, रेंदाळमध्ये मोर्चा; आंदोलक रस्त्यावरच जेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:39 PM2018-08-10T18:39:53+5:302018-08-10T18:40:43+5:30

हुपरी, यळगूड, रेंदाळ, रांगोळी, तळंदगे, इंगळी, आदी गावांत बंदला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आंदोलनात गावोगावचा संपूर्ण

Frontier in Hupari, Randal; The protesters ate on the street | हुपरी, रेंदाळमध्ये मोर्चा; आंदोलक रस्त्यावरच जेवले

हुपरी, रेंदाळमध्ये मोर्चा; आंदोलक रस्त्यावरच जेवले

googlenewsNext

हुपरी : हुपरी, यळगूड, रेंदाळ, रांगोळी, तळंदगे, इंगळी, आदी गावांत बंदला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आंदोलनात गावोगावचा संपूर्ण मराठा समाज सकाळपासूनच रस्त्यावर उतरला होता.
मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या आमदार व खासदारांचा निषेध करण्यासाठी हुपरी येथे मोर्चात त्यांची प्रतीकृती म्हणून बकरी सहभागी करण्यात आली होती.राजकीय ईर्षा, गटबाजी, मतभेद बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते. हुपरी व रेंदाळ येथील आंदोलकांनी दुपारचे जेवण रस्त्यावरच घेतले.

हुपरी येथे मराठा आंदोलकांनी रस्त्यावरच जेवण करत शासनाचा निषेध केला.

Web Title: Frontier in Hupari, Randal; The protesters ate on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.