पूर्व वैमन्स्यातून शाहूनगरमध्ये तरुणावर खूनी हल्ला, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 1:49pm

शाहूनगर येथे पूर्व वैमन्स्यातून तरुणावर तलवारीने खूनी हल्ला केला. विशाल प्रकाश वडर (वय २०, रा. भाजी मार्केट समोर, शाहूनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन संशयित गौरव अशोक भालकर (२७, रा. प्रतिभानगर) याला अटक केली.

कोल्हापूर ,दि. १० : शाहूनगर येथे पूर्व वैमन्स्यातून तरुणावर तलवारीने खूनी हल्ला केला. विशाल प्रकाश वडर (वय २०, रा. भाजी मार्केट समोर, शाहूनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन संशयित गौरव अशोक भालकर (२७, रा. प्रतिभानगर) याला अटक केली. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. त्याचे अन्य दोन साथीदार धिरज देवकर (रा. राजेंद्रनगर) हे पसार आहेत.

अधिक माहिती अशी, विशाल वडर यांचे शाहूनगर येथे गाडा आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गाडा बंद करुन तो घरी जात असताना पाथरवट गल्लीमध्ये दादा जगताप यांच्या पानपट्टीमध्ये सिगारेट घेतले. तेथून घरी जात असताना पाठिमागून दूचाकीवरुन आलेल्या गौरव भालकर, धिरज देवकर व आर. के गल्लीतील बुलेटवाला मित्र या तिघांनी शिवीगाळ करीत तलवार, बिअर बाटल्या व काठीने बेदम मारहाण केली.

डोक्यात, पाठिवर, पोटावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती अत्यावस्थ बनल्याने त्याला राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात हलविले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी गौरव भालकर याला अटक केली.

 

संबंधित

‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!
शेतकर्‍याची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा!
तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास!
पढेगाव येथे कोळसा भट्टीवरील मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारास अटक
कोल्हापुरात पोलिस असलेची बतावणी करुन वृध्दासह महिलेला लुटले

कोल्हापूर कडून आणखी

पानसरे हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जबाब द्यावा, कोल्हापुरात डाव्या कार्यकर्त्यांची मागणी
कांदा मात्र तेजीत, साखर, तुरडाळीचे भाव कोल्हापूरच्या आठवडा बाजारात घसरले
ऊसपट्ट्यातील बहुतांशी शेतकरी वंचित राहणार
‘सारथी’च्या रचनेबाबतचा अहवाल डिसेंबरअखेर
आंबोली, आंबा घाट बनलेत ‘घातपाताचे केंद्र’

आणखी वाचा