पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:33 PM2019-02-19T13:33:59+5:302019-02-19T13:35:45+5:30

पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णु उर्फ बाळासाहेब रावसो भोसले (वय ६७) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. 

Former Mayor of Panhalal, senior journalist Balasaheb Bhosale passed away in Pune | पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन

पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन

googlenewsNext
ठळक मुद्देपन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष

पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णु उर्फ बाळासाहेब रावसो भोसले (वय ६७) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. 

बाळासाहेब धाकटी कन्या डॉ. कोमल हिच्या विवाह समारंभासाठी १० फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गेले होते. विवाह समारंभ झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बाळासाहेब १९९५ मध्ये पन्हाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीतच सोमेश्वर तलावाचा गाळ काढण्यात आला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता तसेच पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलाव विकसित करण्यासाठी ते धडपडत होते. मसाई पठार विकासासाठी त्यांनी सादर केलेली योजना सरकारकडे प्रलंबित आहे.
१९८0 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पन्हाळा मतदारसंघातून निवडणूकही लढविली होती. पन्हाळा विकास आघाडीच्या माध्यमातून ते पन्हाळ्याच्या विकासासाठी सातत्याने धडपडत होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघाची स्थापना त्यांनी केली. या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांना त्यांनी एकत्र आणले. सांगलीच्या नवसंदेश आणि नंतर सामना दैनिकातून ते लिहित होते. सध्याही नवसंदेशमधून सातत्याने ते लिखाण करत होते.

पन्हाळगडावरील प्राचीन अंबाबाई मंदिर भक्त मंडळामध्येही ते सक्रिय होते. या मंदिराचा जीर्णोध्दारही त्यांनी केला होता. पन्हाळा, जोतिबा, वीरशिवा काशिद आदी ऐतिहासिक व पौराणिक विषयावरील छोटेखानी पुस्तिका त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांचा कल  होता. पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी ऐतिहासिक आणि दुर्लक्षित परिसरात माहितीचे फलक लावले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Former Mayor of Panhalal, senior journalist Balasaheb Bhosale passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.